जेव्हा किंमत समजते

“यावेळी मी काहीही कसर करणार नाही पूजेच्या कार्यक्रमात…सगळे नाव काढतील माझं बघ…”
निशा नवऱ्याला सांगत होती. लग्नाला 5 वर्षे झालेली, निशा आणि मिहीर दुसऱ्या शहरात नोकरीला, काही कार्यक्रम असला की मगच सासरी जाणं होई.
दरवर्षी सासरी पूजा असायची, तेव्हा ही दोघे आठवडाभर लवकर जात असत. निशा आपला पूर्ण सहभाग तिथे देत असे. आवडीने सगळं करी..पण नवीन असल्याने सुरवातीला काही गोष्टी तिला माहीत नसायच्या..जसं की अमुक एक पूजेला अमुक असा नैवेद्य लागतो, तमुक असा प्रसाद लागतो…ती सगळं शिकत होती. पण उलट तिला टोमणे बसायचे…”एवढही माहीत नाही का??”
आपल्याला खरंच माहीत नाही म्हणून ती सुरवातीला स्वतःला अपराधी समजायची…पण 4 वर्ष तिने सतत निरीक्षण केलं आणि सगळं समजून घेतलं.
या वर्षी जेव्हा जायची वेळ झाली तेव्हा निशा पूर्ण तयारीनिशी गेली. यावेळी तक्रारीला काही कारणच सोडणार नाही बघ…मिहिरलाही निशा ची तळमळ बघून बरं वाटलं.
ठरल्याप्रमाणे दोघेही घरी गेले. गेल्या गेल्या निशा ने पूजेसाठी लागणाऱ्या सामानाची यादी बनवली..स्वतः सगळं घेऊन आली. निमंत्रण तिनेच दिले…प्रसाद…नैवेद्य सगळं अगदी काटेकोर केलं. घरचे अवाक झाले…तक्रारीला काही कारणच नाही…पण त्यांची नजर कुठेतरी काहीतरी कुरापत शोधत होती.
पूजा आटोपली, पाहुण्यांनी निशा चं भरभरून कौतुक केलं..
“फार लवकर घरातले संस्कार उचलले हो…कुळाचार अगदी तंतोतंत पाळतेस… आम्हाला तर अजूनही जमत नाही…”
निशा ला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. पण घरच्या माणसांकडून कौतुक ऐकायला ती आसुसली होती.
जायची वेळ झाली..पण तरीही अजून कुणी कौतुकाचा एक शब्दही बोललं नव्हतं…
काहीही न बोलता घरच्यांनी त्यांना निरोप दिला. निशा ला वाईट वाटलं…तक्रार करताना एवढंसं कारणही पुरतं पण कौतुक करायला यांना इतकं का जड जावं?
पुढील खेपेला घरचे निशा ची वाट बघू लागले, मागच्या वेळी सारखं निशा अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडेल असं त्यांना वाटलं…
पण निशा आणि मिहीर लवकर आले नाही…सासूने फोन केला…
“यावेळेस येणार नाही का लवकर?”
“लवकर येऊन काय करू? 2 दिवस आधी नक्की येतो…”
सासूला टेन्शन आलं..
“अगं पण…”
“काय झालं??”
“इथलं कोण करेल?”
“दरवेळी तुम्हीच करता ना??”
“हो पण… तुझ्यासारखं नाही जमलं गं कधी…तू कसं अगदी वेळेत आणि नियोजनपूर्वक सगळं पार पाडलं… यावेळी तुझीच वाट बघतोय गं…”
घ्या…एक वर्षानंतर सासू हे म्हणाली…याचसाठी तर केला होता अट्टहास…
एक गोष्ट निशा ला समजली…आपण स्वतःला गृहीत धरायला लावलं तर कुणीही किंमत करणार नाही..जरा त्यातून हात काढता घेतला की मग किंमत समजते…
निशा लगबगीने तयार होते..
“मी लगेच तयारी करून बस पकडते…मिहीर येतील नंतर…”
तिच्यात एक नवीन आवेश संचारला…सासूला खूप हायसं वाटलं…तिने सुटकेचा निश्वास सोडला..


बघा, कौतुकाचा एक शब्द माणसाला आतून बाहेरून बदलून टाकतो…पण इथेच तर कंजूसपणा करतात ना लोकं… काय करणार…जाऊद्या, आपण तरी असं नाही वागायचं…

______________
जाहिरात
ढोकळा बनवा 10 मिनिटात, माहेश्वरी ढोकळा पीठ, संपूर्ण रेसिपी सह
_______
#भाजणीच्या_चकल्या बनवा 15 मिनिटात.
घरगुती आणि सुरक्षितरित्या बनवलेल्या “माहेश्वरी” चकली भाजणी पिठाच्या चकल्या, पूर्ण रेसिपी सह. चकली शिवाय फराळ पूर्ण कसा होईल? आता बनवा झटपट चकल्या अगदी सोप्या. घरपोच पीठ मिळवा अगदी सहज. खालील नंबर वर तुम्ही व्हाट्सअप्प/कॉल करू शकता.
1 kg- 300 रुपये फक्त.आजच संपर्क करा.
9421609656
9834029424
 पूर्ण रेसिपी 
_______

Leave a Comment