छोटीशी प्रेमकथा -1

“दीड वर्ष…फक्त दीड वर्ष आहेत तुमच्याकडे… या दीड वर्षात एकमेकांशी बोलायचं नाही आणि भेटायचं नाही…खरं प्रेम असेल तर दीड वर्षांनी पुन्हा एकत्र याल”

निकीताच्या घरी आज अजित आणि निकीताचा चांगलाच समाचार घेतला जात होता.

निकिता आणि अजित एकाच कॉलेजमध्ये शिकायला.

निकिता बोलकी, सुंदर…

अजित गरीब, पण कष्टाळू, मेहनती…

दोघांचं बोलणं एका इव्हेंट निमित्ताने झालं..

एकमेकांचे गुण आवडले, सहवास वाढत गेला आणि प्रेम जुळलं..

शेवटचं वर्ष होतं,

एव्हाना कॉलेजमध्ये सर्वांना त्यांचं प्रेमप्रकरण समजलं होतं..

अजितचे आई वडील गावाला असायचे, पण ते काही हरकत घेणार नाही हे त्याला माहित होतं..

निकिता मॉडर्न कुटुंबातली…

राहणीमान, सुखसोयी सगळं आधुनिक दर्जाचं..

पण प्रेमात हे सगळं कुठे पाहिलं जातं..

कॉलेजचा शेवटचा दिवस होता..

आता पुन्हा भेट होणार नाही हे दोघांना माहीत होतं..

दोघेही पार्किंगमध्ये उभे..

एकमेकांशी सद्गतीत होऊन बोलत होते..

नेमक्या त्याच वेळी निकिताचे वडील कॉलेजमध्ये आलेले..

एका नातेवाईकाच्या मुलाच्या ऍडमिशन साठी,

त्यांनी दोघांना एकत्र पाहिलं..

दोघांना घरी बोलवण्यात आलं..

दोघांनी स्पष्ट सांगितलं,

आम्ही एकमेकांशीच लग्न करणार..

निकिताच्या आईने विचार केला..

हा मुलगा गरीब दिसतोय, निकिताने याचा नाद सोडायला हवा..

पण प्रेमात आंधळी ती..कसली ऎकतेय..

शेवटी आई वडिलांनी बाजूला जाऊन चर्चा केली..

“यांचं हे प्रेम वैगरे काही नाही, तरुणपण अंगात भिनलय फक्त..थोडे दिवस वेगळे राहिले की आपोआप विसरतील एकमेकांना..”

****

भाग 2
भाग 3

3 thoughts on “छोटीशी प्रेमकथा -1”

Leave a Comment