चौकट-3

 आणि सांगितलं,

कसं वागावं याला मापदंड नाही,

नावडतीचे मीठ कायम अळणी असते,

तुझ्या मर्यादेपर्यंत जितकं चांगलं वागता येईल तितकं वाग,

परफेक्ट बनण्याचा अट्टहास नको…

तुला पटेल तसं वाग,

फक्त कुणाचा अपमान होईल, कुणाला त्रास होईल असं करू नकोस,

मुलीला समजलं, आईला काय म्हणायचं आहे ते..

आईने सुस्कारा टाकला,

आता तिला प्रश्न पडत नाहीत,

तिला जसे आवडतात तसे पोहे ती आता बनवते,

मनाला आवडतील तसे कपडे घालते,

नोकरी करतांना घराच्या कामांसाठी जीवाचं रान करण्याचा अट्टहास धरत नाही,

पैसे कमावते आणि आवडीने खर्च करते,

कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही,

स्वतः काम करते आणि स्वतःचच कौतुक करून घेते,

आता तिला कसं वागावं,

हा प्रश्न पडत नाही,

कारण तिला समजलं होतं,

दुसऱ्याच्या चौकटीत वागून ते कधीही समाधानी होत नाहीत,

त्यापेक्षा ती चौकट मोडून स्वतःशीच समाधानी असलेलं बरं…

समाप्त

16 thoughts on “चौकट-3”

  1. 👌 सुंदर नाही अति सुंदर 👌
    👌 प्रेरणादायी संदेश 👌

    Reply
  2. माझा एक किस्सा : कालच टाॅवेल धुतले होते म्हणून आज नाही टाकले धुवायला तर सासूबाई बोलल्या , अग रोज धुवायचे टाॅवेल. ठीक आहे मी म्हटल. मग मी दुसर्या दिवशी पण टाकले धुवायला तर म्हणतात अग रोज रोज धुवून खराब होतील लवकर 🤣🤣🤣🤣🤣

    Reply
  3. खूप छान.. असा अनुभव बहुतेक सगळीकडेच येतो… कितीही चांगल वागा समोरचा तुमच्या चुकाच शोधणार… कौतुक नाही करणार..

    Reply

Leave a Comment