चांगुलपणा-3

“ही मुलाखत घ्यायची आमच्या कंपनीची एक वेगळी पद्धत आहे, माणूस मुलाखतीत स्वतः जो नाहीये तो आहे असं दाखवतो, पण बाहेरचा सिक्युरिटी हा माणूस जसा आहे तसा त्याला ओळखून घेतो, म्हणूनच मी सिक्युरिटी बनून बाहेर बसलो आणि तुम्हा सर्वांना जज केलं”

“पण सर, आमचं शिक्षण आणि अनुभव तरी बघा एकदा”

“शिक्षण, अनुभव हे वेळेनुसार मिळवता येतं.. पण संस्कार हे उपजतच असावे लागतात..जे मला बाहेर गेटपाशी दिसले”

बॉसने सुयशकडे प्रेमाने पाहिलं आणि विचारलं,

“तुम्ही बोला, काय अपेक्षा आहे तुमची?”

बॉस असं बोलताच चुलतभवाच्या जीवावर आलं, तो म्हणाला,

“सर तो काही शिकलेला नाहीये, कसला अनुभव पण नाही..माझा resume बघा, MBA झालं आहे माझं..त्याला डिलिव्हरी बॉय म्हणून गाडी सुद्धा चालवता येत नाही नीट”

“माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार, बरं झालं ही गोष्ट आम्हाला आधीच समजली…नाहीतर डिलिव्हरी बॉय साठी याला घेतलं असतं”

चुलतभाऊ हसायला लागला,

बॉस म्हणाले,

“म्हणूनच याला मॅनेजर पदासाठी घेतोय”

सगळे candidate एकमेकांकडे पाहू लागले, त्यांच्याकडे डिग्री होती, सुयशकडे काही नसतांना त्याला हे पद? एकाने म्हटलं,

“सर सगळं ठीक आहे पण याचं शिक्षण नाही काही नाही, हे पद याला झेपेल का?”

“आपली फूड कंपनी आहे, लोकांना चांगलं अन्न पुरवायचं काम आपण करतो, एका अर्थाने पुण्याचं काम करतो, आपल्या हाताखालच्या लोकांना कामं वाटून देणं, त्यांच्याशी आणि ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणं हे मॅनेजरचं काम..आणि मला वाटतं यासाठी हा मुलगाच योग्य आहे. रस्त्यात ती कुंडी मुद्दामच आडवी ठेवली होती, कुणीही विचार केला नाही की आपल्या मागून येणार यावरून पडेल..तो विचार सुयशने केला..process मधले चॅलेंज दूर करून सर्वांसाठी रस्ता सुकर करणे हेच मॅनेजरचं काम, नाही का?”

सुयशला नोकरी मिळाली,

तो आनंदाने घरी गेला आणि आधी आईचे पाय धरले,

“आई, तू आज माझ्याकडून वचन घेतलंस त्यामुळे आज मी यशस्वी झालो…खरं आहे आई तुझं, चांगुलपणा कधीही सोडू नये..कुठे ना कुठे देव त्याचं फळ देतोच..”

काही वर्षांनी,

चुलतभाऊ आणि काकांनी नको तिथे पैसे अडकवत नुकसान करून घेतलं, याउलट सुयशने चांगल्या पगारातून स्वतःच्या जीवावर घर उभं केलं आणि सुयशच्या चुलतभावावर सुयशकडे नोकरी मागायची वेळ आली…

तात्पर्य:

चांगुलपणाचं एक अदृश्य फळ असतं,

ती कधी, कसं आणि कुठून मिळेल सांगता येत नाही.

चांगुलपणा-3

1 thought on “चांगुलपणा-3”

Leave a Comment