सुयश आणि त्याची आई हतबल होऊन आपल्या घरात बसले होते,
आज त्यांना समजलं होतं की काकांनी आणि त्यांच्या मुलांनी गावाकडची सगळी जमीन आणि घर त्यांच्या नावे करून घेतलं होतं,
सुयशचे वडील खूप आधी देवाघरी गेलेले,
तेव्हापासून या दोघांकडे कुणीही येत नव्हतं,
गावाकडूच्या मालमत्तेतून नवीन घर घ्यायचं त्यांचं स्वप्न होतं,
पण सगळं अपूर्ण राहिलं,
सुयश आणि त्याची आई असे दोघेही एका छोट्याश्या घरात रहात होते,
आई शिवणकाम करायची आणि सुयश छोटीमोठी कामं करायचा,
पैशाअभावी शिकताही आलं नाही,
आज त्याची एका ठिकाणी मुलाखत होती,
पण हे काकांनी मालमत्ता हडप केली ऐकून त्याचा नुसता तिळपापड होत होता,
वाटायचं कोर्टात जावं,
पण आईने त्याला समजावलं,
“बाळा खोटेपणाने मिळवलेली गोष्ट फार काळ टिकत नाही, आणि तो तुझा भाऊच आहे, कुणी परका नाही. तुला जे मिळवायचं ते कष्टाने मिळव”
सुयश मुलाखतीची तयारी करत होता, चिडलेला होता त्यात आईचं हे बोलणं,
“या चांगुलपणामुळेच आज आपण गोत्यात आलोय आई, उद्याच काकांकडे जाऊन त्यांना जाब विचारुन येतो”
त्याचा आव बघून आईला काळजी वाटू लागली, त्यात तो पटापट आवरत होता,
आई त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला म्हटलं,
“तुला तुझी आई तुझ्यासोबत हवं असेल तर वचन दे मला”
“कसलं वचन?”
“कुणी कसंही वागलं तरी तू तुझा चांगुलपणा सोडणार नाहीस”
“आई मला उशीर होतोय”
*****
भाग 2
भाग 3