गेलं उडत-2

तिचे संस्कार,

बिचारं माझं लेकरू,

ते फुटकं नशीब पर्यंत येऊन थांबते…

त्यामुळे चार दिवस सासूबाईंसमोर जरा जास्तीची कामं केली तर निदान या खेपेला तरी आपण “good girl” म्हणून राहू असा तिचा विचार होता…

ती लवकर उठली, स्वयंपाक केला,

धुनी भांडी केली,

ओटा आवरला,

झाडू फरशी केली,

सासुबाई अंगण झाडायला लागल्या,

“अहो आई असुद्या मी करते..”

म्हणत झाडू हातात घेतला…

सासुबाई बघत होत्या…

दुसऱ्या दिवशी,

ती लवकर उठली, स्वयंपाक केला,

धुनी भांडी केली,

ओटा आवरला,

झाडू फरशी केली,

आज ट्रॉलीज पण साफ केल्या,

सासुबाई फर्निचर पुसायला लागल्या,

“अहो आई असुद्या मी करते..”

म्हणत फडकं हातात घेतलं,

सासुबाई बघत होत्या…

तिसऱ्या दिवशी,

ती लवकर उठली, स्वयंपाक केला,

धुनी भांडी केली,

ओटा आवरला,

झाडू फरशी केली,

सासुबाई पडदे धुवत होत्या,

“अहो आई असुद्या मी करते..”

म्हणत साबण हातात घेतला…

सासुबाई बघत होत्या…

चौथ्या दिवशीही तेच..

सगळं काम अगदी वेळच्या वेळी होत होतं,

काटेकोरपणे होत होतं,

वर जास्तीची कामं होत होती,

तिला पक्की गॅरंटी होती,

यावेळी सासुबाई आपलं कौतुक करणार…

पाचवा दिवस उजाडला,

पाहुणे घरी आले,

सासूबाईंच्या पायाला भिंगरीच लागली,

लाडू घे, चिवडा खा, चहा घ्या, अजून एक कप घ्या…

तिने चहा नाश्त्याची डिश आणि कप सिंकमध्ये ठेवले, आधी मशीनमध्ये धुतलेले कपडे दोरीवर वाळत टाकून येऊ मग इथलं आवरू म्हणत ती गच्चीवर गेली,

*****

भाग 3

2 thoughts on “गेलं उडत-2”

Leave a Comment