आज ती जरा जास्तीचेच कामं करत होती,
चार दिवसांनी सासूबाईंच्या माहेरची लोकं येणार होती,
चांगली चार दिवस मुक्काम ठोकणार होती,
हिची साफसफाई सुरू होती,
कशासाठी? ती येताय म्हणून?
छे..!
कारण वेगळंच होतं,
माहेरची माणसं आली की सासूबाईंच्या अंगातच येई जणू,
जणू एका निर्जन वाळवंटात 12 वर्षे राहून अचानक माणसं दिसावीत आणि मनात साठलेलं सगळं बाहेर पडावं, अगदी तसं..
मग अगदी आम्ही चहा कसा बनवतो,
नाष्टा काय करतो,
जेवण कितीला करतो,
इथपासून निघालेली गाडी….
ती कशी कामं करत नाही,
पातेले कढया कश्या जाळते,
भाज्या कश्या पांचट बनवते,
कश्या झोपा काढते,
****
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.