गृहीत-3

 आई अहो आजी सिरीयस आहे, मला जावं लागेल, किमान 2 दिवस तरी थांबेन..

नवऱ्याला फोन लावला,

नेहमीप्रमाणे त्याने उचलला नाही..

ती आजीकडे गेली..

आजी मृत्यूच्या दाढेतून परत आली,

सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला..

गावाकडे ते हॉस्पिटल,

फोनला रेंज नाही,

त्यात ही चार्जर विसरली,

2 दिवसांनी घरी परतली,

पण घरात जे पाहिलं ते पाहून अंगावर काटाच उभा राहिला..

नवरा डोकं धरून बसलेला,

चार दिवस काही न खाल्ल्यासारखा आजारी दिसत होता,

बडबडत होता..

जणू वेड लागलेलं..

तिला पाहताच उठून उभा राहिला..

सासूबाई तावातावाने पुढे आल्या,

काय गं कुठे होतीस 2 दिवस? ना फोन ना काही..

अहो आई असं काय करता? तुम्हाला सांगून तर गेलेले..

कधी?

काल..11 वाजता,

मो तेव्हा कीर्तन ऐकत होते,

तू काहीतरी बोललीस, मला वाटलं जेवायला बोलावते आहेस,

अरे देवा !

तिने कपाळावर हात मारला,

सासूबाईंचे हेडफोन त्यांच्या डोक्यावरून घेतलेल्या पदरातून दिसले नाही आणि ही काय म्हणाली ते ऐकू गेलं नाही…

या सगळ्यात मात्र तो पुरता कोसळला होता,

त्याची अवस्था बघून तिला नवल वाटलं,

कुणीतरी मेल्यावर जो अवतार होतो तसा त्याचा झालेला,

बायको नाही म्हणून त्याने अंग टाकून दिलेलं,

अन्नपाणी सोडून दिलेलं,

आपण ज्याला शिव्या घालायचो तो हाच का?

तिला प्रश्न पडला…

समाप्त..

****

याचे 2 तात्पर्य

बायको नजरेआड झाल्याशिवाय तिची किंमत कळत नाही,

आणि,

नवरे कितीही आळशी असले तरी बायकोशिवाय त्यांचं पान हलत नाही…

1 thought on “गृहीत-3”

Leave a Comment