भाग 1
https://www.irablogging.in/2020/09/1.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/09/2.html
भाग 3
https://www.irablogging.in/2020/09/3.html
भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html
भाग 5
https://www.irablogging.in/2020/09/5.html
गर्भ 6
https://www.irablogging.in/2020/09/6.html
भाग 7
भाग 8
https://www.irablogging.in/2020/09/8.html
#गर्भ_भाग 9
एपिसोड 9 – “ओढ”
गीतेशला धक्का बसतो, दादा आणि वहिनीने अपशकुनी म्हणून मुलाला नाकारलं होतं, त्याला वाटलेलं की दादा वहिनी मुलाचं ऐकून आनंदी होतील…पण आता तर सगळंच संपलं होतं.
दादा वहिनी परत बंगलोर ला जायला निघाले, गीतेश ने त्यांच्याकडे एकदाही पाहिलं नाही…आणि त्यांना थांबवायची त्याची इच्छाही उरली नव्हती. गीतेश घरी जातो..बाबा त्याचीच वाट बघत असतात…
“गीतेश…बाळा काय झालं? सापडला दादा?”
गीतेश मौन असतो…
“बोल ना.सापडला का?”
“हो…पण त्याला या घरात न आणलेलंच बरं राहील..”
“असं का बोलतोय तू? काय झालं?”
“बाबा…फार मोठा धोका झालाय आपल्यासोबत..”
“काय झालं???”
“दादा आणि वहिनी अपत्य प्राप्तीसाठी ivf चा प्रयत्न करत होते..अनेक वेळा ते अयशस्वी झालं, पण जेव्हा यशस्वी झालं तेव्हा दादा वहिनीचा विमानाचा प्रसंग उदभवला..”
“काय?? मग ते मूल?”
“त्याला दुसऱ्या स्त्री च्या गर्भात वाढवलं गेलं..”
बाबा सगळं बळ एकटवुन गीतेश कडे धावत आले…त्याच्या खांद्यावर हात ठेवून ओरडले..
“ते मूल आपलं आहे…या घरण्याचं आहे…सांग दादा वहिनीला…त्याला घेऊन या…सांग..”
“बाबा…त्यांनीच ते नाकारलं..”
“काय बोलतोय..”
गीतेश झालेल्या घटनेचे सर्व बारकावे बाबांना सांगतो…पण बाबा आता पेटलेले असतात..
“स्वरांग…त्याच्या आईचं नाव त्याने अनुराधा सांगितलं होतं… हीच ती सिस्टर अनु….नाही, आमचा वंश आमच्याच घरात हवा..स्वरांग… माझा नातू..”
बाबा रडायला लागतात…गीतेश कसाबसा त्यांना सावरतो..
_____
गिरीजा घरी बसून विचारात गढून गेलेली असते…डॉक्टर शलाका चे शब्द तिच्या डोक्यात घुमत असतात…
“हे बघा गिरीजा मॅडम, तुम्ही गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणताय ती अत्यंत किचकट आहे, रिस्की आहे..आणि त्यासाठी आई अथवा बहिणीचं गर्भाशय लागतं…”
गिरीजा मोठ्या आशेने अनुच्या खोलीत जाते..यावेळीही ती काही दिवस माहेरी आलेली असते…स्वरांग नुकताच कॉलेज मधुन आलेला असतो…अनु त्याला कुरवाळून जेवायला वाढते…कितीही मोठा झाला तरी अनु साठी स्वरांग आपला जीव की प्राण असतो…
“ताई..”
अनु लक्ष देत नाही..
“ताई किती दिवस राग मनात धरून ठेवणारेस..”
“काय बोलायचं आहे.”
गिरीजा ला समजत नाही, कसं सांगू ताईला की तुझं गर्भाशय देशील का??? आईला अनेक आजारांनी जखडलं होतं त्यामुळे आईकडे मागण्यात अर्थ नव्हता…
“ताई…मी एक गोष्ट मागितली तर देशील..”
अनु हसायला लागते..
“ताई काय झालं??”
“लहानपणी तू अशीच तोंड पाडून यायचीस, तुला माझी बाहुली हवी असायची…मग तुझी दया येऊन माझ्या सगळ्या खेळण्या तुला मी द्यायची…असं करत माझ्या सगळ्या खेळण्यांवर कब्जा केला होतास तू..”
“लहानपण किती गोड असतं ना..क्षुल्लक गोष्टीत आपला जीव अडकलेला असतो…तरुणपण सर्वात कठीण…आपल्याला अश्या गोष्टी हव्या असतात त्यासाठी निसर्गालाही आव्हान द्यायला आपण तयार असतो..”
“असं काय हवंय तुला..”
“तुझं गर्भाशय..”
“काय??”
“ताई…मला लग्न करायचं आहे, आई व्हायचं आहे….तुझ्यासारखी आई….”
अनु ला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं…
ती गिरीजाला घेऊन डॉक्टर शलाका कडे येते…
_____
दादा आणि लता वहिनी बंगलोर ला परत येतात…दादा लता ला विचारतो…
“आपलं मूल कसं दिसत असेल गं?? 18 वर्षांचं झालं असेल…”
“तुम्ही तो विषय काढू नका प्लिज…आपल्याला नाही गुंतायचं या मायेत आता…”
लताने बंगलोर लाच शास्त्रीय संगीताचे क्लास सुरू केले होते…आजूबाजूची मुलं तिच्याकडे शिकायला येऊ लागलेली…क्लास संपायची वेळ झाली होती आणि एक पालक दारातच उभा होता…लता एक राग म्हणून दाखवत होती…मुलं तल्लीन झालेले…क्लास सुटला आणि मुलं बाहेर गेली…त्या मुलाच्या आईने लताला सांगितलं…
“काय गोड गळा आहे हो तुमचा…”
“अहो तुमचा अंकीतही खूप छान गाणं म्हणतो..”
“तुम्ही शिकवलं म्हणून…पण गाणं हे रक्तातच असावं लागतं.. तुमच्या मुलाला किंवा मुलीला तर किती छान गाता येत असेल..”
हे ऐकताच लता च्या हृदयातून एक कळ गेली…पहिल्यांदा तिला “माझं मूल” म्हणून आठवण येऊ लागलेली…क्लास सुटल्यावर मुलांना घेऊन जाणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावरचं कौतुक, मुलांचा आपल्या पालकांकडे असणारी ओढ….हे सगळं तिला खात होतं…. लोकं आसुसतात पालक होण्यासाठी… पण मी मात्र स्वतःहून नाकारलं?? कसं असेल माझं मूल?? त्याला गाणं येत असेल का?? माझ्यासारखं दिसत असेल का???
तिला ते सगळं असह्य होतं… तिच्या नवऱ्याला घेऊन ती पुन्हा डॉक्टर शलाका ला भेटायला येते..
______
पंडितजी आणि गीतेश मुलावर आपला हक्क दाखवण्यासाठी डॉक्टर शलाका कडे येतात…स्वरांग ला आपल्या घरी घेऊन जायचं यासाठी वकीलाचीही सोय करून ठेवतात…
सिस्टर अनु, गिरीजा, दादा, लता, पंडितजी आणि गीतेश…
हे सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शलाका ला भेटायला येतात…
क्रमशः