भाग 1
https://www.irablogging.in/2020/09/1.html
भाग 2
https://www.irablogging.in/2020/09/2.html
भाग 3
https://www.irablogging.in/2020/09/3.html
भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html
भाग 5
https://www.irablogging.in/2020/09/5.html
#गर्भ_भाग 6
एपिसोड 6: “स्फोट”
दादा आणि वाहिनीचा फोटो बघत मेघनाद काहीतरी आठवायचा प्रयत्न करतो…
“यांनी ivf साठी प्रयत्न केले होते, आणि मला वाटतं लॅब मध्ये ये यशस्वी झालं होतं..”
“काय????” गीतेश मोठ्याने ओरडतो..
“पण हे कधी झालं??”
“मला नेमकं माहीत नाही, पण एवढं आठवतं की त्या काळात lockdown आणि अन्य गोष्टींमुळे हॉस्पिटल ची कामं जरा बारगळली होती…. पण त्याच्या बरंच आधी ते येऊन गेलेले..”
“म्हणजे, यांची आई वडील होण्याचे चान्सेस होते?”
“हो…पण तू जसं म्हणालास की आता ते नाहीत… अश्या वेळी त्या लॅब सॅम्पल ला डीस्पोज करण्यात येतं… जर वहिनी असत्या तर त्यांच्या गर्भाशयात ते टाकून त्या आई झाल्या असत्या…”
“पण मग तरीही दादा वहिनी घर का सोडून गेले??”
“मला वाटतं त्यांनी आशा सोडून दिली असावी…कारण त्यांचे खूप प्रयत्न अयशस्वी झाले होते…पण त्यावेळी मात्र ते यशस्वी झालं..”
“हे दैव कमाल आहे…दादा वहिनीला थोडं लवकर समजलं असतं तर…त्यांनी घरही सोडलं नसतं आणि घराण्याला वारसही मिळाला असता….”
“खूप वाईट झालं…विमानात तांत्रिक बिघाड होता का??”
“काहीच समजलं नाही…सरकारने खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण विमानाचे अवशेषही सापडले नाही. त्यांच्या मते स्फोट इतका जबरदस्त असावा की जागीच सगळं जळून खाक झालं असावं…”
______
अनु एका गोंडस मुलाला जन्म देते…तीही मातृत्वाची आस अखेर पूर्ण झालेली असते…बाळाला कुठे ठेऊ न कुठे नको असं तिला झालेलं…तिने आपली नोकरी सोडली, हाताशी भरपूर पैसे होते.. नवराही आता सुधारला होता…
दोघांनी नवीन आलिशान फ्लॅट घेतला, घरात सर्व सुखसोयी आणल्या…अनुच्या नवऱ्याने सर्व व्यसनं सोडून नव्याने आयुष्य जगायला सुरवात केलेली…एक बाप म्हणून त्याच्यातला माणूस जागा झाला….त्याने छोटसं हॉटेल सुरू केलं आणि बाळाचा पायगुण म्हणून ते खूप चालत होतं… बाळाच्या आवाजात एक ताल होता…तो हसताना, बोलताना सुमधुर असे सूर नकळत कानी पडायचे…त्यामुळे त्याचं नाव “स्वरांग” ठेवण्यात आलं….
एक दिवस अचानक दरवाजा वाजला आणि दारात पोलीस उभे..
“मिस्टर कल्पेश आणि मिसेस अनुराधा… तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल..”
“कसली चौकशी??”
“काही महिन्यांपूर्वी अमली पदार्थाची अवैध तस्करी झाली होती…त्या संदर्भात…”
अनु एकदम घाबरून जाते, काय करावं तिला कळेना..चूक तर तिने केलीच होती…पण तिला वाटलं नव्हतं की पोलीस इतक्या खोलवर चौकशी करतील असं… तिला स्वरांग ची चिंता सतावू लागली…आम्ही दोघे जर तुरुंगात गेलो तर स्वरांग चं काय होईल??? कोण सांभाळेल त्याला?? ती चक्कर येऊन खाली पडली…कल्पेशने तिला कसंबसं सावरलं…
______
“हॅलो गीतेश…मेघनाद बोलतोय… माझी आजी आली आहे घरी…तीसुद्धा शास्त्रीय संगीतात पारंगत आहे बरं का…वेळ मिळाला की ये, मस्त गट्टी जमेल तुमची…”
“लगेच येतो की, असंही आज काही काम नाहीये..”
गीतेश मेघनाद च्या घरी जातो…त्याच्या अजीशी भेटतो, बोलतो, दोघात मस्त गप्पा होतात… इतक्यात जोरात आवाज येतो..
“Yessssss…”
सर्वजण खोलीपाशी जातात..
“काय रे सुमित?? काय झालं??”
“दादा मी सरकारी माहिती हॅक केलीये…”
“वेडा आहेस का…कशाला असले उद्योग करतोस रे?? बघू कसली कागदपत्रे आहेत??”
“जाऊदे ना दादा…आपल्याला काय करायचं आहे…मी फक्त बघत होतो की मी किती हुशार आहे…आता मी जगातलं काहीही हॅक करू शकतो..हा हा हा..”
“गीतेश… ये इकडे…हा माझा भाऊ सुमित… काहीतरी भन्नाट करायचा याचा छंद… हॅकिंग मध्ये पारंगत…”
गीतेश त्याच्याजवळ येतो…
“अरेवा…पूर्ण कुटुंब अष्टपैलू आहे तर… आजी संगीतात पारंगत, भाऊ मेडिकल आणि तू टेक्नॉलॉजी मध्ये..वा…”
इतक्यात गीतेश चं लक्ष त्याच्या कॉम्प्युटर कडे जातं..
“Missing flight JK 234 in july …rescue operation.. Releasing 3 terrorists…”
अशी काही शब्द त्याला एका ठिकाणी दिसतात..
“एक मिनिट…हे काय आहे बघू..JK234 ही फ्लाईट तर…”
सुमित तो पूर्ण डेटा बघतो, पूर्ण वाचतो आणि किंचाळतो..
“आयला…सरकार पण काय छुपे रुस्तम आहे..यात असं आहे की….बऱ्याच वर्षांपूर्वी ती एक फ्लाईट मिस झालेली ना तिचा अपघात नव्हता झाला…ती हायजॅक झालेली…अतिरेक्यांनी तिचं अपहरण केलं होतं…3 दहशतवादयांना सोडण्याच्या अटीवर त्यांनी विमान प्रवाशांना सोडलं होतं..”
“काय??? मग हे जाहीर का झालं नाही?? खोटी बातमी का दिली??”
“दादा तुला माहीत आहे ना, कंधार च्या घटनेनंतर देशात किती हल्लाबोल चढला होता…आणि इथे असही आहे की सर्व प्रवाशांना या घटनेबाबत मौन ठेवायला सांगितलं होतं… आपण दुसऱ्या विमानात होतो असं कुणी विचारलं तर सांगायचं असं त्यांना सांगण्यात आलेलं…दादा म्हणून मीडियावर जास्त काही दाखवलं नाही आणि मृतांची नावं घोषित करण्यात आली नाही…”
गीतेश ओरडतो..
“म्हणजे…म्हणजे…दादा वहिनी जिवंत आहेत…जिवंत आहेत….”
क्रमशः
______
५ भाग ओपन होत नाही आहे