आरोही तिच्या खोलीत विचार करत बसते, तिच्या डोळ्यासमोर सारखी आर्वी येत असायची. का त्या मुलीबद्दल इतकं प्रेम ऊतू जात होतं समजायला मार्ग नव्हता. नकुलला तिने विचारलं..
“ती मुलगी कोण असेल रे? मला का तिच्याबद्दल इतकं प्रेम वाटतंय?”
“खूप गोड होती ती, तू एक पाहिले का, तिचे ओठ अगदी तुझ्यासारखे होते. नाजूक, रेखीव..”
आरोही विचारात पडली..
“कसला विचार चालुये?”
“नकुल, माझी स्मृती गेलीये…हिचा संबंध माझ्या भूतकाळाशी तर नसेल?”
“असला असता तर तुझ्या आई वडिलांपासून लपून असतं का ते? ते होतेच ना तिथे?”
“काही समजत नाहीये.”
“नको इतका विचार करू. हे बघ, भूतकाळ तू केव्हाच मागे टाकलाय, नव्याने सुरवात केली आहेस तेव्हा वर्तमानाकडे बघ, नको आधीच्या गोष्टी बघुस..”
“माझं ठीक आहे रे..पण तुझं काय होत असेल? मी तरी माझा भूतकाळ सपशेल विसरले आहे, पण तुझं तसं नाही…काव्याला विसरणं शक्य झालं तुला?”
काव्याचा विषय निघताच नकुल भावुक झाला. समोर लावलेल्या फोटोकडे बघत तो भूतकाळात हरवला.
हॉस्पिटलमध्ये काव्या आत होती, बाहेर नकुल नुसता सैरभैर होऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. काव्याला आठव्या महिन्यातच त्रास होऊ लागलेला, खूप गुंतागुंत होती, डॉक्टर बाहेर आले आणि नकुलचं कुटुंबच उध्वस्त झाल्याची बातमी दिली. आई आणि मूल दोघेही वाचले नव्हते. नकुलने कसे दिवस काढले त्यालाच माहीत. दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही फसला, पण एका अपघातात जेव्हा त्याने आरोही अन त्या बाळाला पाहिलं तेव्हा त्याला तिच्यात काव्या दिसली. काव्या पूर्ण बरी होईपर्यंत तो हॉस्पिटलमध्ये होता.. पण त्या बाळाला मात्र कुणीतरी घेऊन गेलेलं, डॉक्टर म्हणाले, बाळाचे नातेवाईक त्याला सांभाळणार आहेत. त्यांनी त्यांची ओळख दाखवून बाळाला नेलं. नकुल कुठल्या हक्काने बाळाला मागणार होता? आरोहिचे आई वडील यायला 1 दिवस लागलेला..
हॉस्पिटलमध्ये आरोहीचे आई वडील आले, त्यांचं बोलणं नकुलने ऐकलं..
“काय गुन्हा केला आम्ही जे माझ्या भावाला आणि वहिनीला देवा तू घेऊन गेलास..वहिनीला अजून पुत्रसुखही प्राप्त नव्हतं आणि माझ्या लेकीची तर स्मृतीच घेऊन गेलास..तिचं लग्नही अजून झालं नाही..”
नकुलला प्रकरण जरा वेगळंच वाटलं..आरोहीच्या मामा मामीला मूल होणार नव्हतं, आरोहीचं लग्न झालं नव्हतं..मग ते मूल? आरोहीला दवाखान्यात नेताना “माझं बाळ, माझं बाळ” म्हणताना त्याने ऐकलं होतं.. म्हणजे ते मूल आरोही चं होतं, पण ही गोष्ट तिच्या आई वडिलांना समजली तर अनर्थ होईल..
एवढी परिस्थिती लक्षात येई ईतपत नकुल हुशार होता, त्याने मौन बाळगलं. आरोहीच्या आई वडिलांनी नकुलचे आभार मानले.
“सॉरी सॉरी नकुल.. मी माझं दुःखं कुरवाळत असताना तुला वाईट आठवणीत ढकलून दिलं.. माफ कर प्लिज..”
“तू ठरवून तर नाही केलं ना..सोड..”
“नियतीने आपल्या दोघांना एकत्र आणलं तेही कश्या अवस्थेत बघ ना.. मला मूल होनार नाही, तू तुझी बायको अन मूल गमावलं, अन मी तर भूतकाळाच गमावला.. अशी समदुखी माणसं एकत्र आली तर आयुष्य सुखी होतं का?”
“मी तुला स्वीकारू शकलो कारण तुझ्यात मी फक्त आणि फक्त काव्याला बघत राहिलो..”
“माझ्या आईचं म्हणणं होतं, मला कुणी मुलगा देणार नाही आणि तुलाही कुणी स्वीकारणार नाही, म्हणून आपल्या दोघांचं लावून दिलं गेलं..”
“आरोही, आपलं ठरलं आहे ना..आयुष्यात खूप दुःखं पहिलीत आपण, आता त्रागा न करता दोघांनी एकमेकांच्या सुखासाठी मागचं सगळं विसरायचं, काहीही झालं तरी आयुष्य कुणासाठी थांबत नाही, मग ते रेटण्यापेक्षा आनंदी जगायला काय हरकत आहे?”
आरोहीला खरं तर वाईट वाटत होतं, नकुलला त्याच्या भूतकाळाची आठवण करून देत त्याच्या जखमा पुन्हा जाग्या झालेल्या..पण त्याचं म्हणणं तिला पटलं, आयुष्य कुणासाठी थांबणार नाही..
नकुल खोलीच्या बाहेर आला आणि आरोही खोलीत आणलेल्या कपड्यांच्या घड्या घालू लागली. आरोही कामात आहे याची खात्री करत नकुलने फोन लावला..
“त्या बाळाची काही माहिती मिळाली?”
“शोध चालू आहे साहेब..एवढं समजलं की काही महिने ते बाळ अनाथाश्रमात होतं.. पुढे त्याला कुणी नेलं याची नोंद आश्रमाने दिली नाही, आम्ही खूपच आग्रह केला तेव्हा रजिस्टर मध्ये नोंदी बघायला गेलो, पण त्या बाळाची नोंद आढळलीच नाही..”
_____
“खुशी…चल आता मला जायला हवं..आता सागर आणि तुझा संसार सुखाने कर..स्वतःची काळजी घे..”
“ताई, तुम्ही गेलात तर घर अगदी सुनं सुनं होऊन जाईल बघा..”
“मग लवकर पाळणा हलवा..घराला पुन्हा चैतन्य येईल..”
खुशी लाजली, प्रमिलाने निरोप घेतला. प्रमिलाची गाडी दूरवर जाईपर्यंत खुशी तिला बघतच राहिली. आत येताच तिने सागरला फोन केला..
“ताई काही सांगणार नाहीये..मला सागर कडून माहिती काढावी लागेल..”
Khup vel lagto ahe 4 th part sathi….kathe til interest nighun jato
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!