खडा-1

“अगं आई माझे ते निळ्या रंगाचे कानातले शोधून दे ना, मला तेच हवे आहेत..”

8 वर्षाची सिया आईला म्हणत होती,

दिवाळीचा दिवस होता, संध्याकाळची लगबग सुरू होती,

करुणाची जरा जास्तच धावपळ,

घराची साफसफाई, सजावट, रांगोळी, पूजेची तयारी, दोन्ही मुलांची तयारी आणि संध्याकाळी सोसायटीच्या महिलांचं एकत्र जमून फोटोशूट..

ही धावपळ नेहमीचीच, म्हणून ती जरा लवकर उठली, आज लवकर उरकून घ्यावं, असं दरवेळी तो ठरवते पण शेवटी घाई व्हायची ती व्हायचीच..

तिने पटापट स्वतःची तयारी केली, सियाचे नखरे सांभाळत..

तिला भरीस भर म्हणून चार वर्षाचा विहान पण नटायला मागे पुढे बघत नव्हता,

“माला पण पावडर लाव, माझे केस विंचरून दे”

ही लगबग सुरू होती, करूणा सगळं आनंदाने करत होती, या सगळ्यात घरभर  पसारा झालेला..

कॉटवर कपडे, ज्वेलरी पडून होते,

पण करुणा खुश होती, आज नेहमीपेक्षा माय लेक सुंदर दिसत होते,

****

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a4%be-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a4%be-3/

Leave a Comment