रेखा आणि तिच्या नवऱ्याने कसेबसे पैसे जमवले आणि ओमची फी भरली,
एके दिवशी शिल्पाचा फोन आला,
“अगं आई मला बरं वाटत नाहीये, आज ऑफीसला काही जाणार नाही मी..घरीच आराम करते”
तिच्या या सांगण्यामागे उद्देश हा की तिला आयतं जेवण पाठवावं..
आईची तगमग सुरू झाली,
लगेच रेखाला आवाज दिला,
“रेखा, अगं शिल्पाला बरं नाहीये…तिला दोन दिवस डबा पाठवू म्हणते.. छान मऊ भात, शिरा बनव..थालीपीठ पण बनव…संध्याकाळी काहीतरी वेगळं देऊ”
रेखाने ते ऐकलं..
आता मात्र तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झालेला..
सासूबाईंना त्यांच्या मुलीची सेवा करायची असेल तर खुशाल करावी, पण मला दावणीला बांधून का?
तिच्या मनात प्रश्न उठले,
नणंदबाईंसाठी आजवर इतकं केलं, पण त्यांनी ओमसाठी कधी साधं चॉकलेट तरी आणलं का?
त्यांना कितीदा डबा पाठवला, वाळवण पाठवलं, फराळ पाठवलं..कधी कौतुकाचे दोन शब्द तरी बोलले का?
ओमला पैशांची गरज आहे हे नणंदबाईंना माहीत होतं, तेव्हा मदत करावीशी वाटली नाही का?
हे प्रश्न सुरू असतांनाच भात करपला..
सासूबाई आधीच मुलीच्या काळजीने येरझारा घालत होत्या, त्यात जळलेल्या भाताचा वास आला आणि त्या सुरू झाल्या,
“साधा भातही जमत नाही का तुला? की मुद्दाम करतेय हे? तुझ्या आईने हेच शिकवलं का?”
आता मात्र रेखाच्या सहनशक्ती चा कडेलोट झाला..ती हात पुसत बाहेर आली..
“सासूबाई, हा भात शिल्पा साठी नव्हताच.. आणि डबा वगैरे काही देणार नाहीये मी तिला..तुम्हाला हवं तर स्वतः बनवा आणि देऊन या…ओमच्या शिक्षणासाठी साधी मदत केली नाहीत, आणि शिल्पाच्या मुलीला इतकी महागडी गिफ्ट देताना मात्र तुम्हाला काही वाटलं नाही? आजवर तिच्यासाठी सगळं करत गेले पण कुणी काडीचीही किंमत केली नाही, प्रेमापोटी सगळं करत गेले..पण आता बस…तुम्हीच म्हणाला ना की काटकसर करून पैसा जमवता आला नाही का?
आता तेच करणार आहे, आजपासून याच्या त्याच्या घरी जेवण पाठवणं बंद, सतत डबा द्यायला इथे किरण्याचं कोठार नाही, आणि वर प्रवासाला पेट्रोल लागतं तो खर्च वेगळाच, नाही का? आणि हो,माझ्या आईने मला बरंच काही शिकवलं आहे, म्हणून आत्तापर्यंत बोटं चाटत मी बनवलेलं जेवण सगळे जेवत होते…पण तुमच्या मुलीला मात्र तुम्ही काही शिकवलेलं दिसत नाही, म्हणून सतत डब्यासाठी फोन करत असते…यापुढे मला असली काम सांगायची नाहीत, मी करणार नाही म्हणजे नाही..”
रेखाने आज पहिल्यांदा स्वतःसाठी stand घेतला होता,
हे तिने फार पूर्वीच करायला हवं होतं खरं तर..
महिलांनो,
आपणही कित्येकदा दुसऱ्यासाठी, नातेवाईकांसाठी आपलं कितीतरी आयुष्य खर्ची घालत असतो,
पण ही ऊब एकतर्फी नसावी,
दोन्ही बाजूंनी समान प्रेम मिळत असेल तर नातं जपायला आणि एकमेकांसाठी काही करायला काहीच वाटत नाही..
पण जेव्हा दुसऱ्याचं करता करता आपला स्वतःचा संसार पणाला लागत असेल तर मात्र विचार करायला हवा…
मैत्रिणींनो,
स्वतःसाठी खंबीरपणे लढायला शिका…
समाप्त
खुपच छान , सकारात्मक लेख आहे.
छान आवडला
Khupch sundar ahe
फारच छान. असेच स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उत्तर द्यावेच लागते.
khup chan…..sunder……
Khup chan asch thankavun sangayla have…
खूप च छान निदान रेखा ने स्वतः साठी स्टँड तरी घेतला .पण या नंतर ची परिस्थिती वेगळी च झाली असेल.वाईट सून …ऐकून दाखवणारी …अशी अनेक नावं तिला मिळाली असणार .पण छान लिहिले आहे
अगदी खरं आहे हे असंच होतं फार चांगुलपणा कामाचा नाही पण हे सर्व वेळ गेल्यावर लक्षात येते त्याचा उपयोग नाही
खुप छान लिहिलय .मी अशीच सगळ्यांची सेवा करीत राहीले आता मी थकलेय. कोणालाच साधी आठवण येत नाही सर्वांच्याच त्या त्या वेळच्या गरजा पूर्ण झाल्यात. आता काय गरज सरो वैद्य मरोळ. माझ्या सासुबाई सेम असचं करायच्या.
आपला संसार प्रपंच आपण वेळी सावरला पाहिजे म्हणजे अशी वेळ येणार नाही खूप छान प्रेरणादायी लेख.
खूप छान निर्णय घेतला. वेल आली की बोलायला हिम्मत येवून जाते.