याला सर्वांनी एकटं पाडलेलं,
तो अक्षरशः रडकुंडीला यायचा,
बायकोजवळ सांगायचा,
ती फक्त ऐकून घेत होती,
तिला काहीतरी आठवत होतं..
एके दिवशी कंपनीला मोठा तोटा झाला आणि सर्वांनी मिळून हिच्या नवऱ्यावर ढकललं,
मोठे साहेब आले,
प्रचंड चिडले,
हा सफाई देत होता,
मुळातच शिष्ट स्वभाव,
त्यात त्याच्या या उद्धट बोलण्याने साहेब अजून चिडले,
आणि सर्वांसमोर त्याच्या कानशिलात लगावली,
तो सुन्न झाला,
घरी आला,
बायकोला सांगितलं,
ती काही करू शकत नव्हती,
पण तिला काहीतरी आठवत होतं,
सासू नुसते दिवस ढकलत होती,
मुलगा आणि नवरा आपल्याकडे परत प्रेमाने येतील या आशेवर होती,
दगड बनून होती,
सुनबाईला सगळं दिसत होतं,
ती काही करू शकत नव्हती,
पण तिला काहीतरी आठवत होतं..
देवीने दिलेला कौल तिला आठवला,
संसारातच रहा असं आईने सांगितलेलं,
कदाचित हेच बघण्यासाठी,
ज्यांनी तुझ्यावर अत्याचार केला,
त्यांच्यावरही तीच वेळ येणार हा आईने त्यांना दिलेला श्राप होता,
आणि ते प्रत्यक्षदर्शी बघण्यासाठी आईने तिला तिथे हजर ठेवलं होतं…
देवीने तो कौल का दिलेला,
हे तिला आता समजलं..
****
कर्म फिरून माणसाकडे परत येतंच,
ते म्हणतात ना,
No need for revenge. Just sit back and relax. Those who hurt you will eventually screw up themselves and if you are lucky, god will let you watch.
“बदला घेण्याची भाषा करू नका, मागे सरा आणि वाट बघा..ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते स्वतः त्या त्रासातून जातील, आणि तुम्ही भाग्यवान असाल तर देव तुम्हाला ते प्रत्यक्ष पाहू देईल..”
समाप्त
छोटीशी गंमत – आपले सामान्य ज्ञान तपासा👇👇
खरे✔️ आहे. असा चांगला विचार मनात ठेवायला हवा.
प्रत्येकाला असे प्रसंग जिवंतपणी दिसले पाहिजे. आपल्यावर अन्याय केलेल्या लोकांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे.
Duniya gol hai… Sagle firun parat yenarch…
Aavadli katha… Dev ahe 👍💯
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
Karave tase bharave
Chan 👌👌
कोणी कसेही वागले तरी आई बघतेय तर, आपण प्रत्येकाला माफ करण्याची भुमिका घेतली पाहिजे तरच आपल्या मनावरील ओझे कमी झाल्याचा आनंद मिळू शकतो. बाकी कोणाचं काय ते आई प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत असतेच ती बघतेय कोण बरोबर कोण चुक आपण चिंता मुक्त रहायचं….
Ekdam correct 👍💯
खरच चांगले केले की चांगलंच होतं
अगदी खर आहे
खूप छान…. आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिलते, म ते प्रेम असो वा तिरस्कार, मान असो वा अपमान… म्हणून नेहमी चांगलेच करत रहा आपले ही चांगलेच होईल
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!