काळी बाजू-1

मुलीला बघण्यासाठी माय लेक छोट्याशा गल्लीतून पायी चालले होते,

मुलीच्या घराचा पत्ता विचारत दोघेही वाट काढत होते…

ही तरी पसंत पडू दे, आईच्या मनोमन प्रार्थना करत होती..

राकेश, एक गरीब मुलगा,

हातावर पोट..

छोटेमोठे कामं करून पोट भरायचा..

आई वडील गावाला,

वडील व्यसनी,

आई अधूनमधून येऊन लेकराची विचारपूस करायची,

त्याला एक जोडीदार मिळाला की तीही मोकळी होणार होती,

आईला झेपत नव्हतं आता सगळं..

राकेशला आईचे भाव स्पष्ट दिसत होते,

बऱ्याच मुली पाहून झालेल्या,

काही राकेशला पसंत पडत नव्हत्या,

तर काहींना राकेश,

उद्याच्या कमाईचा काही भरोसा नाही त्याच्याशी कोणती मुलगी लग्न करणार?

राहायला छोटीशी पत्र्याची खोली,

किचन म्हणजे जेमतेम जागा,

त्यात चूल मांडलेली,

त्याच्याकडे बघून लग्न करावं असं कुणालाही वाटणार नाही..

जसजसं ते मुलीचा पत्ता विचारत आत जात होते तसतसं गल्लीतले लोकं त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले,

****

4 thoughts on “काळी बाजू-1”

Leave a Comment