खरं तर तिच्या या जिद्दीमुळे आणि साहसामुळेच सासरच्यांनी तिला पसंत केलं होतं,
नवऱ्याच्या जीवावर उड्या न मारता स्वतः एक उंची प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांना खूप आवडली होती,
म्हणूनच त्यांनी होकार दिला,
पण लग्न झालं की जबाबदाऱ्या येणारच,
कितीही म्हटलं तरी थोडंफार इकडेतिकडे होणारच,
आज सकाळी झालेला प्रसंग तिच्या जिव्हारी लागलेला,
आई आणि लेक बोलत असतानाच आतून आजीचा आवाज आला,
“मनीषा, ती मीना लग्नासाठी बोलावतेय, काय करायचं? काय सांगू तिला?”
“हो सांगा..”
अंथरुणात असलेल्या तिच्या आजीने आतुन आवाज दिलेला, साधना आली आहे हे त्यांना माहीत नव्हतं,
“पाहिलंस आई? आजी किती आदराने बोलते तुझ्याशी,तुझं मत विचारते, तुझ्या मताला किती किंमत आहे ते..”
आई हसली,
“बरं तुला नाही जायचं ना सासरी? नको जाऊ, थांब इथेच”
साधनाने एक सुस्कारा टाकला,
तिला धाक होता की माहेरी आई मला समजावून परत जाण्यासाठी आग्रह करेल, पण आधीच चिडलेल्या मनस्थितीत असलेली ती आता जराशी शांत झाली,
दोन तीन दिवस असेच गेले, साधना माहेराहून तिच्या ऑफिसमध्ये जात होती,
एकदा आई तिच्याजवळ आली आणि म्हणाली,
“तुझ्या कंपनीत एखादी जागा आहे का गं?”
“कशासाठी?”
“माझ्या मैत्रिणीचा एक मुलगा आहे त्याला जॉब हवा आहे”
“या आधीही खूप नातेवाईकांनी विचारलं मला, पण असं कसं सरसकट कुणालाही जॉब देणार? आणि त्यात नातेवाईक म्हटलं तर त्यांना बोलताही येत नाही काही”
“पण हा मुलगा योग्य आहे, त्याचं आय आय टी मधून शिक्षण झालं आहे, MS साठी परदेशात जाणार आहे पण त्याला अजून 6 महिने बाकियेत, तर त्या काळात काहीतरी काम करावं म्हणून तो विचारतोय”
साधनाचे डोळेच चमकले, इतकी हुशार व्यक्ती आपल्या कंपनीत आली तर चांगलंच आहे,
तिने त्याची रीतसर मुलाखत घेतली आणि कामावर रुजू होण्यास सांगितलं,
विहान नाव त्याचं,
खरं तर त्याला ईच्छा नव्हती जॉब करण्याची पण आई वडिलांच्या आग्रहाखातर तो आलेला,
कंपनीत त्याचा पहिला दिवस होता,
आल्या आल्या सर्वांनी त्याचं स्वागत केलं,
पण तो काहीतरी वेगळाच वागत होता,
भाग 3
Vaishali khot
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/ES_la/register?ref=T7KCZASX