कसोटी-1

साधना तावातावाने माहेरी आली, आल्या आल्या बॅग सोफ्यावर भिरकावून दिली आणि डोक्याला हात लावून बसली,

आतून आई धावत आली,

आईला बघताच ती संतापात म्हणाली,

“पुन्हा त्या घरी कधीच जाणार नाही मी, मला काही आत्मसन्मान आहे की नाही?”

आईला समजलं, काहीतरी बिनसलं आहे, आईने शांतपणे न घाबरता तिला आधी एक ग्लास पाणी आणून दिलं,

थोड्या वेळाने तिला शांत करून विचारलं,

“नक्की काय झालंय सांगशील?”

“आई मी सकाळी ऑफिसला निघत होते, माझ्या वाटेची कामं करून मी तयार होत होते तोच घरी गावाकडचे पाहुणे आले. मला वाटलं सासुबाई बघून घेतील, पण त्यांचं सुरू झालं..पाणी आण, नाष्टा बनव, भाजी टाक.. मला ऑफिसला जायला उशीर होत होता याचं काही नाही त्यांना. मी म्हणाले की मला लवकर आटोपायचं आहे तर म्हणे एखाद्या दिवशी उशिरा गेलं तर काही बिघडत नाही..माझ्या कामाचा काही आदरच नाही..जिथे माझ्या आणि माझ्या कामाचा आदर नाही तिथे मी थांबू शकत नाही..”

आईला सगळं समजलं,

हे असं कधीतरी होणारच होतं हे तिला माहीत होतं,

साधना लहानपणापासूनच हुशार, जिद्दी मुलगी होती,

तिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं,

बारावीनंतर आय आय टी ची परीक्षा दिली पण थोड्यावरून नंबर हुकला,

पण तिने हार न मानता नोकरी न करता स्वतःची कंपनी सुरू केली, डिजिटल मार्केटिंगची,

हाताखाली काही माणसं होती, आणि कंपनी हळूहळू मोठी होत होती,

अश्या कंपनीची ही मालकीण, ऑफिसात तिला भरपूर मानसन्मान, आदर मिळायचा,

लग्न करतानाही तिने सासरी अट ठेवली होती की माझ्या कामामध्ये खंड पडेल असं काहीही वागायचं नाही,

*****

भाग 2

कसोटी-2

1 thought on “कसोटी-1”

Leave a Comment