“मानलं हा तुला, देवानंतर नंबर तुम्हा स्त्रियांचाच.. कुणी कितीही त्रास दिला तरी तुम्ही त्यांचं चांगलंच चिंतणार”
“तुला अजूनही आवडते का रे मी?”
“हा काय प्रश्न आहे?”
“नाही म्हणजे कॉलेजमध्ये असताना तुझी स्वप्न पाहिलेली मी…पण तू स्वप्नातच राहिलास..”
“मी तिथेच असतो, माझं घरच ते…”
इतक्यात दारावरची बेल वाजली, साडेपाच वाजले होते, तिचा नवरा घरी परतला होता..
“आले वाटतं तुमचे साहेब..जा, दार उघडा..”
ती हसली, डोळे चोळत उठली आणि दार उघडलं..
नवरोबाने तिच्या हातात बॅग देऊन ओझं हलकं केलं..
“चहा टाक बरं पटकन..” असं म्हणत तो सोफ्यावर आडवा झाला..
त्याला ना तिचं थकलेलं शरीर दिसलं ना कठोर हात…
चहाचा घोट घेत त्याने विषय काढला..
“उद्या संध्याकाळी गावाला निघायचं आहे, आईकडे थांब तू थोडे दिवस, तिला जरा मदत कर कामात…तिथे तिच्या एकटीवरच कामं पडतात सगळी…सून म्हणून तू काहीच कामी येत नाही तिच्या…”
“बरं..” तिने मान हलवली आणि हळूच कल्पककडे बघितलं..
तो केव्हाच हवेत विरला होता…
स्वप्नात येऊन स्वप्नातच गायब झालेला…
कल्पक…कल्पनेतला… त्याला ना आकार ना शरीर…
त्याला प्रियकर म्हणा, वा स्वप्नातला राजकुमार…
***
प्रत्येक स्त्री ची दोन भावविश्व असतात,
एक ते, ज्यात ती वास्तव जगत असते…
आणि दुसरं ते, जे तिला हवं असतं…
ही दोन विश्व एकमेकांना समांतर असतात,
ती कधीच एकमेकांना छेदत नाहीत..
जर छेदले गेलेच, तर ती जगातील सर्वात भाग्यवान स्त्री असेल…!!!
समाप्त
खर आहे
Very true
अगदी खरंय..👌
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/kz/join?ref=W0BCQMF1