कल्पक -1

नवऱ्याला आणि मुलांना तिने तयारी करून शाळेत पाठवलं..

आणि घरात येताच एक सुस्कारा टाकला..

दार लावून घेतलं आणि घराकडे एकदा बघितलं..

नुसतं अस्ताव्यस्त..

एखादी वस्तू शोधायची म्हणजे सगळ्या वस्तू बाहेर काढायच्या आणि पुन्हा आत ठेवायच्याच नाहीत..

हा जणू नियमच..

का?

कारण आई आहे ना आपण गेल्यावर सगळं आवरायला..

तिने सगळा पसारा आवरला..

ओट्यावरचा पसारा बघून तिला वैताग आला..

तिने मोबाईलवर गाणी लावून मग आवरायला घेतलं..

मग आवरणं जरा सुसह्य झालं..

त्यात आज ट्रॉली साफ करायला काढलेल्या तिने..

सगळं आवरून झालं अन तिने सुस्कारा टाकला..

दोन घास जेवण केलं..

सगळं करत तिला दुपारचे तीन वाजले..

दमलेलं शरीर घेऊन ती आडवी झाली आणि डोळे मिटले..

तेवढ्यात एक उबदार हात हातात आला..आणि त्याने विचारलं..

“दमलीस का गं?”

तिने वर पाहिलं..कल्पक आला होता…तिचा प्रियकर..

“अरे कल्पक, बस बस..”

“मी काय विचारलं, दमलीस का?”

“हो रे, आज फारच काम पुरलं बघ..”

“आज? अगं रोजच पुरतं तुला, बघतो ना मी…”

***

 

भाग 2

कल्पक -2

भाग 3 अंतिम

कल्पक -3 अंतिम

2 thoughts on “कल्पक -1”

Leave a Comment