कर्माचा नियम

 कचरागाडीच्या घंटेने सगळा परिसर जागा झाला, बायका माणसांची धावपळ सुरू झाली. एक तर सेकंदाचा जरी उशीर झाला तरी गाडीवाला गाडी पुढे घेई, फार attitude त्याला. सुनीता पोळ्या लाटत होती, आज एक भाजी जास्त टाकल्याने पोळ्यांना जरा उशीर झालेला.. मनोजला आज सुट्टी होती..तिने आवाज दिला,

“अहो मी पोळ्या लाटतेय, तेवढा कचरा टाकून द्या ना..”

तिचा आवाज ऐकून सासूबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, तणतणत त्या सुनीतापाशी आल्या आणि म्हणाल्या..

“ही कामं माझ्या मुलाने करायची का? तुला कचरा टाकायचा तर टाक नाहीतर पडू दे तसाच..”

सुनीताने गॅस बंद केला, चरफडत कचरा टाकला आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. मनोज कचरा टाकायला आळस देत पुढे येतच होता पण आईचे हे शब्द ऐकून त्याचा आळस अजून चवताळला. पुन्हा एका जागी तो ठाण मांडून बसला. सुनीताला हे सासुबाईंचं वागणं मुळीच पटत नव्हतं. घरातलं एखादं काम माणसाने केलं तर त्यात काय इतका अपमान वाटावा यांना? दोघांनी मिळून घरातली कामं करायला हवी, ते तर दूरच, लहानसहान कामही त्या मनोजला करू देत नसत. सुनीता सासूबाईंची तब्येत बघता त्यांना काही करू देत नसे..याचाच फायदा घेऊन त्या म्हणत…

“पोराच्या जातीला शोभतात का असली कामं? तुला नसेल जमत तर मी करते..”

सुनीता मग गपगुमान स्वतःच सगळा भार डोक्यावर घेई. जेवणानंतर ताट उचलून ठेवणं, जेवायला बसताना ताटं आणि पाणी घेऊन बसणं, बाई कामात असेल तर चहा गाळून घेणं ही कामही सासूबाई मनोजला करू देत नसत, त्यांच्या मते सुनीताने मनोजला सगळं हातात द्यावं.

मनोजने एक साधा व्यवसाय सूरु केलेला, हाताखाली माणसं ठेवलेली ती सगळी बघून घेत. व्यवसायातून घर चालेल इतका पैसा घरात येत होता. मनोजच्या आळशी स्वभावाला अनुसरून त्याला हे सगळं अनुकूल होतं. कधितरी दुकानावर चक्कर मारायचा आणि घरी येऊन जेवण करून झोपा काढायच्या इतकंच काम. पण सासूबाईंना मात्र त्याचं भयाण कौतुक.

“माझा लेक किती कष्ट करतो..” हेच त्यांचं तुणतुणे चालत असे.

(10 वर्षांनी)

सासूबाईं आजारी पडल्या, सासरे कधीच देवाघरी गेलेले. सासूबाई बेडवरच पडून होत्या..त्यांना सगळं आयतं लागायचं. मनोजच्या आळशी स्वभावामुळे व्यवसायात त्याला नुकसान होत गेलं, हाताखालच्या माणसांना काढावं लागलं कारण त्यांना पगार द्यायला आता पैसे उरायचे नाही. त्यामुळे मनोजला आता स्वतः दुकानात पूर्णवेळ बसावं लागे. घराची वाताहत झाली, कारण काही वर्षांपूर्वीच मनोजच्या आळशी स्वभावामुळे सुनीता ने घराला रामराम ठोकला होता. घरातली लक्ष्मी गेली अन घर भकास झालं. सगळीकडे अस्ताव्यस्त.. पसारा..आठ आठ दिवसाचा कचरा साचून राहायचा..सासुबाई धीर करत कधीकधी त्या टाकून देत असत पण आता तर उठणही मुश्किल होतं. स्वयंपाकाला एक बाई लावली होती. एके दिवशी तो आईजवळ गेला आणि तिला म्हणाला..

“आपल्याला स्वयंपाक करणाऱ्या मावशींना काढावं लागेल..”

“का रे?”

“दुकानात एक माणूस लावलाय कामाला..त्याला पगार द्यावा लागेल..”

“अरे पैसे कमी आहेत तर तू स्वतः बसत जा ना दुकानात..”

“मला नाही जमणार पूर्णवेळ दुकानात बसायला..”

“पण मग स्वयंपाक कोण करेल? आणि घरातली इतर कामं?”

“आता तूच थोडी हालचाल कर..”

सासूबाईं कशाबशा उठत, कसाबसा स्वयंपाक करत..पण काम करताना सतत चक्कर येई.. त्या म्हणत..

“मनोज अरे एवढी भाजी तरी चिरुन दे रे..”

“मनोज अरे घराला झाडू नाही लावला चार दिवसांपासून, पायाला कचकच लागतेय. तेवढा झाडू कर रे बाबा..”

“मनोज अरे कचरा गाडी आली तेवढा कचरा टाक रे..”

मनोज मात्र हलायला तयार नसे..

“ही कामं मी करू? माझी कामं नाहीत ही.. पडू दे पडून राहत असेल तर..”

आपली ही कामं नाहीत असा पक्का समज त्याच्या आईनेच त्याला करून दिलेला. आणि आज तोच आईला भोवला..

काही वर्षांपूर्वी घडलेली घटना सासूबाईंना आठवली..सुनीता अशीच कामं मनोजला सांगत होती, तेव्हा मी आडकाठी केली..मुलाला चार कामं शिकवली असती, ही कामं फक्त बाईची नाही असं शिकवलं असतं तर.. आज मुलाने माझी वाताहत केली नसती.. सुनीता सुद्धा घर सोडून गेली नसती..माझ्या चुकीच्या संस्कारांमुळे आज माझ्यावरच वाईट वेळ आली, फाजील लाड मलाच भोवले.. आपल्या पुरुषी अहंकारापेक्षा संसार महत्वाचा हे सांगायला हवं होतं मी, मुलाच्या संसाराचा सत्यानाश केला. 

सासूबाईंना आज सुनीताची खूप आठवण येत होती पण वेळ मात्र निघून गेली होती..

*****

बहुप्रतिक्षित ईरा दिवाळी अंक 2021 आम्ही आपणासमोर सादर करत आहोत एका सुंदर स्वरूपात. अंकात आपण वाचू शकता विविधांगी लेख, कथा, विनोदी साहित्य, कविता, expert’s talk, दिवाळीच्या रांगोळ्या, रेसिपीज आणि बरेच काही. यावेळच्या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे “बाल ईरा”. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि पुस्तकाच्या माध्यमातून विविध उपक्रमात त्यांनी व्यस्त राहावे यासाठी बाल ईरा टीम ने विशेष प्रयत्न करून आपल्यासमोर अंक सादर केला आहे. 

❤️❤️❤️ईरा दिवाळी अंक 2021 ❤️❤️❤️

मर्यादित प्रति..

आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

https://forms.gle/ka3vMa5Mv17KryvW9

5 thoughts on “कर्माचा नियम”

  1. खरंय, आयाच मुलांना बिघडवतात. माझा नवरा सगळी कामं करतो,पण मी एक दिवस घरच्या dogila खायला दे म्हणून नवऱ्याला संगीले,तर त्यांना खूप राग आला. म्हणे तू माझ्या मुलावर हुकूम गाजवतेस.😂

    Reply
  2. Khara ahe …aata chya kalat saglyana sagli kaame yaylach havit mag mulga aso kiva mulgi
    Amchyakade sudaivane asa prakar nahi ..swaipak ghratli mhanje actual cooking chi Kama nahi jamat navryala Pan baki sagla karayla tayar asto infact sasubai ch sangtat mala he karayla de tyala mhanun 😀

    Reply
  3. True… Asha bayakanna nawre tabyat lagata n mulane matr sunech kaich aikayach nai yasathi ayushyabhar pratyek seconds la try karat asatat…

    Reply

Leave a Comment