“मित्रा…तू तर गेलास रे, पण तुझ्या मागे हे काय घडतय याची कल्पना आहे तुला? तुझ्या मृत्यूची हळहळ कमी आणि व्यवसाय जास्त झाला आहे. अरे एक अभिनेता आत्महत्या (?) काय करतो, हा समाज तर दुसऱ्याच्या मृत्यूतही नफा काय शोधायला लागलाय…
बॉलिवूड सारख्या मायाजालात तुझं निरागस मन रमत नव्हतं, ऐकण्यात आलं की तुला शेती सारखे प्रयोग करायची ईच्छा होती. नवनवीन गोष्टी शिकायची ईच्छा होती… पण चुकीच्या माणसात अन चुकीच्या जगात तू हरवत गेलास अन सगळंच संपलं..
तुझी हत्या आहे की आत्महत्या हेही माहीत नाही, मीडिया ने कितीतरी कहाण्या रंगवल्या…काहींनी तुझ्या नावाचा वापर करून तुला न्याय देण्याच्या बहाण्याने युट्युब चॅनेल सुरू केले, तुला न्याय देणं फक्त नावालाच, पण तुझ्या मृत्यूचं भांडवल करत ही लोकं चॅनेल च्या फॉलोअर्स साठी मागण्या करू लागले..news चॅनेल वाल्यांनी तीच तीच बातमी घुमवून फिरवून trp साठी सांगितली, प्रत्येक वेळी काहीतरी नवा खुलासा म्हणत मीडिया काहीबाही बरळत गेली….दिशा सालीआन, सुरज पंचोली, करण जोहर, महेश भट्ट, रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी अशी कितीतरी नावं तुझ्या मृत्यूमागे घेतली जात होती…तुझ्या मृत्यूमागे कितीतरी कहाण्या रंगवल्या गेल्या…सत्य काय होतं तुलाच माहीत, पण एकच वाटतं… जाण्या आधी एक चिठ्ठी लिहून जायला हवी होतीस, तसं केलं असतं तर तुझ्या मृत्यूचं भांडवल झालं नसतं… आणि जर तुझी हत्या केली गेली असेल, तर तुला येणाऱ्या धमक्यांबद्दल तू कुणाजवळ तरी मन मोकळं करायला हवं होतंस….
तुझ्या मृत्यूमुळे जगात किती थैमान माजलंय माहितीये? सामान्य जनता एकीकडे हळहळतेय, तर दुसरीकडे तुझ्या याच गूढ मागील कारण शोधण्याचा पायंडा मीडिया वाल्यांनी रचला आहे…अगदी परानॉर्मल ऍक्टिव्हिटी द्वारे तुझ्या आत्म्याशी सम्पर्क करण्याचा प्रयत्न झाला…तेही व्हिडीओ व्हायरल झाले…मग आता तूच सांग, तुझ्या मागे हे इतकं महाभारत घडेल याची कल्पना केली होतीस तू??? म्हणूनच म्हणते…एखादी चिठ्ठी सोडून गेला असतास तर….
खूपच छान…अगदी सत्यपरिस्थिती लिहिलेलं आहे… एक चिठ्ठी सोडून गेले असते , तर एवढं मोठ प्रकरण झालं नसत…