उलगडा-2

पण ती जे वागली ते अनपेक्षित होतं..

तिने नवऱ्याला बाहेर बोलावलं..

शांतपणे विचारलं..

ही मुलगी कोण?

त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता..

तिने त्याला धीर दिला..

मी काहीही करणार नाहीये, मला खरं खरं फक्त सांगा..

त्याने सांगायला सुरुवात केली..

“ही प्रेरणा…माझ्या कॉलेजमध्ये असतानाची माझी प्रेयसी.. तेव्हा आमचं ब्रेकप झालेलं, पण नोकरीनिमित्त पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि आमचं जुनं प्रेमप्रकरण पुन्हा बहरलं..”

तिने विचारलं,

“माझा विचार मनात आला नाही? आपल्या मुलीचा विचार?”

तो म्हणाला,

“यायचा…वाटायचं कुठेतरी चुकतंय, पण आमचं प्रेम इतकं टोकाला गेलं की मी आंधळा होत गेलो..प्रेम आणि नैतिकता, यात सतत द्वंद्व सुरू असायचं मनात, पण शेवटी प्रेमाने सर्व गोष्टींना हलकं ठरवलं..”

“तुमचं खरंच प्रेम आहे प्रेरणावर?”

तो भांबावला, या अनपेक्षित प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना..

“मला माफ कर, आता मी पुन्हा कधीच…”

“नाही…तुम्ही असलं काहीही करणार नाही..”

तो गोंधळला…हिच्या मनावर परिणाम झालाय का? त्याला कळेना..

तिला माहीत होतं,

ती एक साधारण दिसणारी, कमी शिकलेली आणि त्याला न शोभणारी बाई होती..आपल्या नवऱ्याला आपण आवडत नाही हे तिला माहीत होतं..

केवळ संसार रेटण्याचं काम सुरू होतं…

म्हणूनच हा ओढला गेला प्रेरणापाशी..

प्रेरणा आणि तो, विचार, आचार सगळं एक..आवडी निवडी एक..ध्येय एक आणि स्वप्न एक…

एकमेकांना पूरक…

पण आता पुढे काय? प्रश्न होताच..

तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच लपवून प्रेरणा ला आवाज दिला, बाहेर बोलावलं..

ती घाबरत घाबरत आली..

“घाबरु नकोस..तुझं याच्यावर खरं प्रेम आहे?”

“हो” ती बिचकत म्हणाली..

तिने डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,

“यापुढे तू इथेच राहायचं, आम्हाला ना नातेवाईक ना आई वडील…आम्ही दोघे पोरके आहोत…मला फक्त एक मामा, त्याचं घरच माझं माहेर..  कुणीही या नात्याबद्दल विचारणार नाही…तू माझ्या लेकीची आई व्हायचं..माझ्या नवऱ्याची बायको व्हायचं…हा संसार तुझ्या हातात सोपवतेय..”

दोघेही एकमेकांकडे पाहू लागले..

हे काहीतरी भलतंच घडतंय…

खूपच विचित्र,

एकवेळ हिने आकांडतांडव केला असता तर त्रासदायक असता पण नैसर्गिक असता..

पण हा अनैसर्गिक समजूतदारपणा?

हा जास्त भयानक होता..

पण ती ठाम होती…

“प्रेरणा…तू तयार आहेस? तुझं याच्यावर खरं प्रेम असेल तर हे करशील….माझा नवरा, त्याची मुलगी आणि हे घर…यापलीकडे काय हवं आहे तुला?”

ती तयार झाली…दुसरा पर्यायच नव्हता…

नवऱ्याला कळत होतं, कुठेतरी चुकतंय…

सगळे एकत्र राहू लागले..

ती घरापासून तटस्थ राहू लागली..

प्रेरणा आणि तिच्या नवऱ्याचं सूत जुळवू लागली..लेकीला प्रेरणा बद्दल प्रेम फुलवू लागली..

नवऱ्याला प्रेरणाच्या अजूनच प्रेमात पडण्याचे तिचे प्रयत्न सुरू होते…

सर्वांना कळत होतं,

कुठेतरी चुकतंय..

****

भाग 3

उलगडा-3

3 thoughts on “उलगडा-2”

Leave a Comment