आशीर्वाद-3

 बरं झाल्यावर त्याने पुन्हा काम सुरू केलं..

अनेक वेळा निशा आणि कुटुंबाच्या घरासमोरून जाणं होई..

दरवेळी त्याला त्यांनी केलेल्या मदतीची जाणीव व्हायची अन तो मनोमन आभार मानून पुढे जाई..

दिवाळी झाली, बरेचजण गावाला गेले,

निशाच्या नवऱ्याने सुट्टीनंतर पुन्हा ऑफिस जॉईन केलं..

असंच एकदा तो डिलिव्हरी बॉय ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांचा घरातून आवाज आला,

निशाचा लहान मुलगा रडत होता,

आई आई म्हणून ओरडत होता,

त्याने पटकन गाडी थांबवली,

शेजारी पाजारी सर्वजण गावी गेले होते,

काहीतरी गडबड आहे समजून डिलिव्हरी बॉय पटकन आत शिरला,

बघतो तर काय, निशा बेशुद्ध होऊन पडली होती..तिचा मुलगा घाबरला होता, रडत होता..

त्याने क्षणाचाही विलंब न करता भावाला सांगून ऐंबुलन्स बोलावली, निशाच्या नवऱ्याला फोन करून हकीकत सांगितली..

डॉकटर म्हणाले, गोळ्यांची रिऍक्शन झाली होती..निशाने चुकून चुकीच्या गोळ्या घेतल्या होत्या.. पण वेळेवर आलात म्हणून औषधांची रिऍक्शन कंट्रोल मध्ये करता आली..

निशाच्या नवऱ्याने त्या माणसाचे आभार मानले,

“तुम्ही नसता तर…”

“काही महिन्यांपूर्वी मी हेच तुम्हाला म्हणालो होतो, आज देवाच्या कृपेने मला त्या उपकाराची परतफेड करायला मिळाली…दुसऱ्याला नेहमी मदत करणाऱ्यांची मदत देव करतो..कधी तुमच्या रूपाने तर कधी माझ्या ..”

समाप्त

5 thoughts on “आशीर्वाद-3”

Leave a Comment