रावसाहेबांच्या चेहऱ्यावर आज वेगळीच चमक असते..भावना रावसाहेबांसमोर येते आणि म्हणते..
“अभिनंदन… सत्याची नेहमी जीत होत असते…तुमची बाजू सत्याची होती, तुम्ही जिंकलात.. ”
“सत्याची नेहमीच जीत होते असं नाही..काही पूर्वग्रह आणि विचार सत्यालाही पायचीत करतात..”
भावनाला रावसाहेबांचा रोख समजला…राबसाहेब पुढे बोलायला लागले..
“तुझी बाजू सत्याची होती भावना..तुझ्या वकिली व्यवसायाला अनुसरून सत्याची बाजू धरून ठेवणारा तुझा स्वभाव, आमच्या बंधनाला झुगारून दिलंस ते बरोबरच केलं..पण आमच्यासारख्या संकुचित प्रवृत्तीने तुला समजून घेतलं नाही..तुला या घरातून जावं लागलं…पण खरं सांगतो, तू होतीस तेव्हा घरात चैतन्य होतं…कित्येक वर्षांनी शिखा या घरात आली तेव्हा ते पुन्हा जागृत झालं..याचं कारण माहितीये?? ज्ञानाने प्रकाशलेल्या व्यक्तिमत्वाचा वावर या घरात होऊ लागलेला..पण त्या प्रकाशाची अनुभूती घ्यायला आम्ही आमच्या डोळ्यावरची पट्टी कधी काढलीच नाही.. आज जेव्हा तुझ्या ज्ञानाने घर वाचलं तेव्हा ती पट्टी खाडकन उतरली बघ..”
रावसाहेब शिखा समोर येतात..
“आणि तू…पत्रकार आहेस…कुठलीही घटना आजीला इतकी सविस्तर सांगायची तेव्हा तुझं कौतुक वाटायचं..स्वयंपाकघरात जे व्यवस्थापन कारायचीस ते पाहून वाटायचं की ही मुलगी कमी शिकलेली आहे म्हणून घराकडे लक्ष आहे, पण आज समजलं, तू शिकलेली होतीस म्हणून हे सगळं जमलं तुला..शिकलेली असून कौटुंबिक कर्तव्याला तू कधीही दूर केलं नाहीस..दोन्ही बाजू उत्तम सांभाळल्या. ”
रावसाहेब आता लहान सासूबाईंसमोर येतात.
“तुझी मी सर्वात जास्त माफी मागतो..डॉक्टर सारख्या इतक्या वरच्या पदाला मागे सारत इतकी वर्षे तू घरासाठी त्याग केलास.. मी समजत होतो की घरातल्या सुना शिकलेल्या नाहीत म्हणून घर नीट संभाळताय… पण तू सख्ख्या भावाच्या विरोधातही लढायला तयार झालीस…हे केवळ शिक्षणानेच शक्य आहे..”
घरात वातावरण एकदम बदलून गेलेलं असतं, शिखा आणि लहान सासूबाईंबद्दल घरातल्या बऱ्याच जणांना माहीत नसतं, ते समजल्यावर कित्येकांना आश्चर्याचा धक्का बसतो…
शिखा म्हणते,
“रावसाहेब…आजही समाजात शिकलेल्या मुलीकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे..शिकलेली मुलगी म्हणजे आपल्या वरचढ असणार, आपल्याला दुय्यम समजणार, आपल्याला तुच्छ समजणार हा पूर्वग्रह बाळगून लोकं अश्या मुलींना नाकारतात…फ़ार कमी लोकं असतात जी शिकलेल्या मुलीला अनुकूल असं जीवन देऊ शकतात..पण खरं सांगू का, दुसऱ्यापुढे नम्र होणं, दुसऱ्याचा आदर करणं, परिस्थितीशी जुळवून घेणं, कुठल्याही कामात एकाग्र होणं हे सगळं शिक्षणच शिकवतं…”
एवढ्यात बाहेर काही स्त्रिया येतात…
“ताई, मुलाला तीर्थ द्या..”
सासूबाई अन शिखा एकमेकींकडे पाहायला लागतात…रावसाहेब त्यांच्या नजरेतील भाव ओळखतात..
मिश्कीलपणे हसून राबसाहेब विचारतात..
“काय प्रताप केले आहेत आता सगळी सांगूनच टाका..”
शिखा रावसाहेबांना वर्तमानपत्रातील लेखपासून ते पोलिओच्या डोस पर्यन्त, सगळं कथन करते…त्यांनी आपलं शिक्षण लपवूनही आपलं काम कसं सुरू ठेवलं याचा सगळा वृत्तांत कथन केला..
रावसाहेब हे ऐकून एकदम स्तिमित होतात..विचार करून अखेर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं..
“पोरींनो, खरंच…जिद्द काय असते हे तुमच्याकडून शिकावं, माझ्यामुळे तुम्हाला आपलं शिक्षण लपवून इतका खटाटोप करावा लागला..पण यापुढे नाही…आता घरात नवीन नियम…या घरात येणाऱ्या मुलीला घरकाम आलं नाही तरी चालेल, पण ती कर्तृत्ववान असावी…माझ्या या लेकींसारखी.. ती पदवीधर असावी..चौथी नापास असेल तर या घरात त्यांना जागा नाही..”
घरात आनंदी आनंद होतो..
“शिरप्या आपला टेम्पो काढ…भावना चं सगळं सामान घेऊन ये इकडे…माझ्या लेकीचा पुन्हा एकदा गृहप्रवेश करायचा आहे..”
समाप्त
Khup chaan
Uttam👌👌
खूप छान
khup chanhoti
Apratim…… Waiting for new story
Superb
खूप सुंदर
Khup chan
Khup chan
Khup chan
Excellent…khupach sunder…
Excellent…khupach sunder…
Khup chan
खूप छान कथा आहे.
Khupach chan…
खूप छान
khup sundar katha ahe. shikshan gheun tyacha ahkankar n balgta tyacha upyog samajasathi kasa krta yel ani shikun muli vaya jatat asa samaj thevnarya samajala ek soppya bhashet samaj dili h. khup chan….
संपूर्ण कथा खूप आवडली 😊👌👌
खूपच सुंदर कथा. आजही समाजात शिकलेल्या मुलींना घरकाम येत नाही म्हणून सून म्हणून नाकारले जाते. लोक कितीही सुधारले तरी मुलींना घरकामच्या जबाबदरीपासून मुक्त करायला तयार नाहीत.
Apratim 👍👍
Khup chhan
अप्रतिम
Khup sunder katha ahe…
एकदम झकास,
खिळवून ठेवणारी,
मस्त
Good