अदृश्य शक्ती-1

रेखाच्या सासरी रेखाच्या भावांचं प्रचंड कौतुक सुरू होतं..

“बाई, बाई, बाई…भाऊबीजेला किती काय काय दिलं रेखाच्या भावांनी.. महागडी साडी काय, सोन्याची चेन काय, पर्स काय, बांगड्या काय..आमच्यासाठी एकेक वस्तू काय..भाऊ असावेत तर असे..”

भावाचं कौतुक ऐकून बहीण भारावून गेलेली,

भाऊ जाताच तिने माहेरी आईला फोन केला,

“अगं दादाने किती काय काय आणलं माझ्यासाठी.. माझ्या सासरची लोकं तर कौतुक करता थांबत नाहीयेत..”

हे ऐकून आईला खुप आनंद झाला,

रेखाचा नवरा, घरातला मोठा भाऊ..

लहान भावाचं नुकतंच लग्न झालेलं,

त्याच्या कामामुळे त्याला भाऊबीजेला जाता आलं नव्हतं, पण त्यानेही अनेक वस्तू भावासोबत पाठवून दिलेल्या..

आईने दोन्ही सुनांना बोलावलं आणि आनंदाने सगळं सांगितलं..

****

भाग 2

भाग 3

Leave a Comment