हाय हिल्स (high heels)

सकाळचे 10 वाजलेले असतात, रश्मी तिच्या ऑफिस मध्ये एन्ट्री करते..एरवी लगबगीत चालणारी रश्मी ऑफिस मध्ये शिरताना कायम दबक्या पावलांनी येत असायची, शून्यातून उभं केलेलं हे विश्व डोळे भरून पुन्हा पुन्हा पहायची. मोठ्या मेहनतीने तिने लेडीज footwear ची कंपनी सुरू केलेली.. आधी एका खोलीत चालणारं काम आज एका स्पेशल ऑफिस मध्ये चालत होतं.. हाताखाली 50 माणसं, मार्केटिंग टीम एका सेक्शन मध्ये, प्रोडक्शन टीम एका सेक्शन मध्ये…आणि रश्मी चं भलमोठं केबिन एका बाजूला…रश्मी ने ऑफिस चं इंटेरिअर असं केलं होतं की टेबल पासून ते रिसेप्शनिस्ट च्या डेस्क चा आकार टोकदार हिल्स असलेल्या सँडल्स चं होतं… footwear चं हे ऑफिस आतूनही खूप सुंदर होतं…

Lockdown नंतर सर्वजण पुन्हा कामावर रुजू झाले होते…सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क होते…

रश्मी आत आली आणि सर्वजण उभे राहिले…सर्वांना गुड मॉर्निंग करून ती आपल्या केबिन मध्ये गेली..थोड्या वेळाने तिची सेक्रेटरी आली..

“बोला…आज काय शेड्युल आहे..”

“11 वाजता मार्केटिंग टीम सोबत मिटिंग आहे, गेल्या महिन्यात चालवलेल्या कॅम्पेन चा रिपोर्ट टीम सादर करणार आहे….2 वाजता मिस्टर ललवाणी सोबत मिटिंग आहे, त्यांचा गारमेंट चा बिझनेस आहे, collaboration साठी ते प्रपोजल सांगणार आहेत…आणि 4 वाजता काही interviews आहेत…production टीम साठी माणसं कमी पडताय, मॅनेजर ची संख्या वाढवावी लागेल..”

असं म्हणत सेक्रेटरी ने आजचं शेड्युल आणि त्याची फाईल रश्मी समोर ठेवली… रश्मी ने पटापट फाईल चाळली आणि बंद केली..आपल्या नजरेतून काहितरी ओळखीचं वाचलं असं तिला वाटलं, तिने पुन्हा फाईल उघडली, त्यात ज्यांचे interview होते त्यांची नावं होती…तिने एक नाव वाचलं…”नकुल भोसले..”

तिने सेक्रेटरी ला सांगितलं,

“आजचे interview मी घेणार..”

“Ok मॅडम..”

रश्मीचे चार वाजेपर्यंतची सगळी कामं झाली…चार वाजता candidates यायला सुरुवात झाली…रश्मी ने सर्वांचे interview पटापट उरकले आणि नकुल चा interview शेवटी ठेवला…

अखेर नकुल चा turn आला…नकुल सर्वात हँडसम, उंच आणि डोळ्यात भरणारा मुलगा होता…स्टाफ मधील काही मुली उगाच त्याला पाहण्यासाठी चकरा मारत होत्या…

“May I come in mam??”

“Yes come in..”

नकुल मॅडम कडे बघून एक स्माईल करतो… मास्क आणि गॉगल च्या आड असलेला चेहरा तो बघायचा प्रयत्न करतो पण त्याला ओळखता आलंच नाही..

रश्मी एका तीक्ष्ण नजरेने त्याच्याकडे बघते…आणि मनातला संताप लपवत त्याला विचारायला सुरवात करते..

“काय अनुभव आहे तुमचा..”

“मॅम मी फायनान्स मध्ये काही वर्षे काम केलं आहे..”

“मग आता इकडे कसं काय..”

“मला चेंज हवा होता..”

“ही सवयच आहे का तुमची??”

“सॉरी??”

“नाही म्हणजे, एकाच गोष्टीला कंटाळता तुम्ही…आज ही उद्या ती..”

“तसं नाही…म्हणजे..”

“असुद्या…मध्ये तुम्ही हॉटेलिंग व्यवसाय पण try केला होता, त्याचं काय झालं..”

“आं?? ते…जमलं नाही..”

नकुल विचार करत बसतो…आपण हे आपल्या resume मध्ये टाकलंही नाही, मग यांना कसं कळलं???

“आयुष्यात काय जमलंय तुम्हाला..”

“काय??”

“काही नाही…बाकी सांगा..तुमच्याबद्दल..”

“मी SN कॉलेज मधून डिग्री केली..नंतर.”

“ते सगळं सोडा…तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोला…”

“वैयक्तिक म्हणजे…. मला माझी मित्र कंपनी प्रिय4 असा आहे…आम्ही दर विकेंड ला मजामस्ती करतो..लग्न झालं आहे…बायको आहे…जॉब करते..”

“कशी आहे तुमची बायको..”

“ठीक आहे..”

“तुमच्या love life बद्दल सांगा..”

नकुल अश्या विचित्र प्रश्नांनी गोंधळून जातो…पण उत्तरं तर द्यावी लागणार होती, ही नोकरी त्याला मिळवायचीच होती..

“माझं एका मुलीवर प्रेम होतं… शाळेत असताना पासून…तिचं माझ्यावर खरं प्रेम होतं..”

“तुमचं नव्हतं का?”

“होतं, पण जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता..ती अतिशय साधी होती..शाळेनंतर आम्ही एकत्रच कॉलेज ला गेलो…सगळ्या मॉडर्न मुली होत्या…पण ती मात्र अगदी साधी राहायची…मला तिची लाज वाटायला लागली…
एकदा तिच्या वाढदिवसाला मी तिला हाय हिल्स च्या सँडल्स घेऊन दिलेल्या. पण तिला त्यावर धड चालताही येईना…कॉलेज मध्ये तिने कौतुकाने ते घालून चालायला सुरुवात केली अन सर्वांसमोर ती पडली… माझा अपमानच झाला एक प्रकारे…मी तिला खूप बोललो…की इतर मुली बघ किती सहजपणे या सँडल्स वर वावरताय..आणि तू अशी गावठड..त्या दिवशी मी तिच्याशी नातं तोडलं…
नंतर आमच्याच कॉलेज मधल्या एका स्मार्ट अन बोल्ड मुलीशी माझं सूत जुळलं…आणि मी लग्नही केलं..”

“मग खुश आहेस का..”

“नाही…आजही मला पश्चात्ताप होतोय तिच्याशी नातं तोडण्याचा.. माझी बायको दिसायला कितीही चांगली असली तर मन मात्र तिचंच सुंदर होतं… पण तोवर वेळ निघून गेलेली..”

“बरोबर आहे तुमचं.. वेळ निघून गेलीये..” असं म्हणत तिने चेहऱ्यावरचा मास्क आणि गॉगल काढला…नकुल एकदम उभा राहिला..

“तू???”

“होय…मीच..आणि पश्चात्ताप नको वाटू देऊस…तू मला सोडलं नसतं तर त्या आज हे सगळं उभं राहिलं नसतं…आणि तुझी पात्रता असूनही आम्ही तुला घेऊ शकत नाही, आपल्या दोघांच्या वैवाहिक संबंधांना अडचण येऊ शकते…you may go now..”

नकुल घाम पुसत तिथून उठला..ऑफिस चं हाय हिल्स चं इंटेरिअर बघता बघता त्याच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग पुन्हा गेला…आणि अजून जास्त पश्चात्ताप करत निघून गेला…

6 thoughts on “हाय हिल्स (high heels)”

Leave a Comment