हस्तक्षेप-5 अंतिम

तुझी बायको मोठमोठे व्रत करत नाहीत हे तुला कधीपासून दिसायला लागलं? आणि सुट्टीच्या दिवशी फिरायला न जाता मंदिरात जाऊन दानधर्म करायला तुझी बायको सांगते ते दिसलं नाही तुला? कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुझं तिच्याशी वागणंच बदललं…तुला बैल म्हटलं आणि तुला ते खरंच वाटलं, मग ती कशी तुझ्या आज्ञेखाली राहील याचा विचार तू करत गेलास..अरे शिकली सवरलेली मुलगी ती, जुन्या काळातल्या बायकांसारखं मान खाली घालून बसेल का?”

श्रेयस एकदम गप्प झाला. ओम खरं बोलत होता..सिया श्रेयसकडे रागाने बघत होती…

“तू काय बघतेय त्याच्याकडे….आणि काय गं सिया? तुला त्याची आर्थिक परिस्थिती माहीत होती ना? अगदीच हलाखीचे नाही आणि अगदीच ऐशोआराम नाही असं मध्यमवर्गीय कुटुंबातले आहात दोघे…दोघांनी एकत्र मिळून प्रगती करायची हे तू जाणून होतीस, मग तो तुला सुखसुविधा पुरवत नाही हे कधीपासून आठवायला लागलं तुला? तो नको तिथे खर्च करत नाही, पैसे वाचवतो म्हणूनच एका वर्षात नवीन घर करू शकले ना तुम्ही? मग तो कधीपासून कंजूस वाटायला लागला तुला?”

दोघांचेही डोळे खाडकन उघडले, ओम पुढे बोलू लागला..

“माफ करा पण मी जरा स्पष्टच बोलतो. जोवर तुमचे आई वडील तुमच्याकडे आले नव्हते, तुमच्या संसारात ढवळाढवळ केली नव्हती तोवर तुमचं सुखात चाललं होतं. त्यांनी दोन शब्द काय एकमेकांबद्दल सांगितले आणि तुमची तर मतच बदलून गेली..इतकं तकलादू आहे का तुमचं नातं? अरे कॉलेजमध्ये एकमेकांसाठी काहीही करायला तयार असायचा तुम्ही…आणि आता काय झालं?

हे बघा मला तुमच्या आई वडिलांबद्दल आदर आहे, ते आपल्या मुलांचं हितच चिंतणार, पण एका ठराविक वयानंतर मुलांना त्यांचं आयुष्य असतं, ते परिस्थिती नुसार आणि बदलत्या काळानुसार जगावं लागतं हेही त्यांनी समजून घ्यायला हवं. ते आपल्या सुनेला आणि आपल्या जावयाला एका साच्यात बघू पाहताय. सुनेने टिपिकल असावं आणि जावयाने पैसा ओतावा हे जरी त्यांना वाटत असलं तरी प्रत्यक्षात संसार तुम्ही करत आहात, तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला जास्त माहिती… तुम्हा दोघांना कधीही एकमेकांसोबत असताना पारतंत्र्यात असल्यासारखं वाटलं नाही, दोघेही एकमेकांना समजून एकमेकांना खुश ठेवत होतात… आणि आई वडील काय आले तुमची मतच बदलून गेली…आता एकच करा, त्यांना ठामपणे सांगा की आम्ही आमच्या संसारात खुश आहोत, त्यांनी कितीही सुनावलं सून किंवा जावयाबद्दल तरीही तुमची मतं बदलू नका…समजलं??”

सिया आणि श्रेयस एकमेकांकडे बघू लागले, ओम शब्दन शब्द खरं बोलत होता… नजरेनेच दोघांनी एकमेकांना माफ केलं… स्वतः माफी मागितली…पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला…

तेवढ्यात वेटरने टेबलवर बिल आणून ठेवलं..ओम म्हणाला,

“श्रेयस, तुझ्या बायको आणि साल्याचं बिल भरणार का? की घेऊन जाऊ माझ्या बहिणीला? मला काही जड नाही माझी बहिण..”

तिघांमध्ये हशा पिकला, वातावरण एकदम बदललं..

मानलेल्या भावाने मात्र सख्ख्या भावाप्रमाणे आपलं कर्तव्य पार पाडलं आणि पुन्हा एकदा श्रेयस आणि सियाच्या संसाराची घडी बसवली….

समाप्त

4 thoughts on “हस्तक्षेप-5 अंतिम”

 1. Hi there,

  My name is Mike from Monkey Digital,

  Allow me to present to you a lifetime revenue opportunity of 35%
  That’s right, you can earn 35% of every order made by your affiliate for life.

  Simply register with us, generate your affiliate links, and incorporate them on your website, and you are done. It takes only 5 minutes to set up everything, and the payouts are sent each month.

  Click here to enroll with us today:
  https://www.monkeydigital.org/affiliate-dashboard/

  Think about it,
  Every website owner requires the use of search engine optimization (SEO) for their website. This endeavor holds significant potential for both parties involved.

  Thanks and regards
  Mike Paterson

  Monkey Digital

  Reply
 2. Wow, awesome weblog layout! How long have you ever been blogging for?
  you made running a blog look easy. The whole look of your web site is fantastic, as neatly as the content material!
  You can see similar here sklep internetowy

  Reply

Leave a Comment