हस्तक्षेप-3

ओम निर्धास्त झाला, पुढे ओमचं सुद्धा लग्न झालं आणि तोही त्याच्या संसारात रुळला.

पण श्रेयसच्या या अचानक आलेल्या कॉल ने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ओमने त्यांचं लग्न व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता, आता त्याला यात लक्ष घालणं महत्वाचं वाटलं.

तो आधी सियाकडे गेला. तिच्या घरातलं वातावरण बदललं होतं. तिची आई आधीसारखी वागत नव्हती. कदाचित माझ्याबद्दल राग असावा असं ओमला वाटलं. सिया समोर आली. निस्तेज, निराश आणि तब्येत खालावलेली अशा सियाला बघून ओमला रडू आलं.

“सिया, काय गं तायडे काय झालं..”

भावाचे प्रेमळ शब्द ऐकताच सियाला बांध फुटला आणि ती रडायला लागली…

तेवढ्यात तिची आई पुढे झाली आणि आईने बोलायला सुरवात केली..

“काय रे ओम, तू तर फार कौतुक करत होता त्या श्रेयसचं.. आता काय झालं?”

“पण मावशी नक्की झालंय तरी काय??”

“दोघांचं लग्न झालं आहे, त्याच्यावर आता जबाबदारी आहे याचं भान नाही का त्याला? आपल्या बायकोला सुखात ठेवावं, तिच्या गरजा पूर्ण कराव्या या गोष्टी काही सांगाव्या लागतात का?”

“म्हणजे नेमकं काय झालं?”

“आम्ही मागच्या महिन्यात त्यांच्याकडे राहायला गेलेलो, श्रेयसचं आम्ही पाहिलं. बायकोला सन्मान देत नाही, खोचकपणे बोलतो सियाला…तिच्या एकेक कुरापती काढतो..एवढं सगळं करूनही सियाला सर्व सुखसुविधा नाहीत..छोट्याश्या फ्लॅटमध्ये राहतात दोघे. जवळपास दुकानं नाहीत…भाजी मार्केट सुद्धा लांब. श्रेयस किराणा भाजीपाला आणतो त्यातही इतकी कंजूशी..माझी लेक कशी राहत असेल त्याच्यासोबत ?”

ओमला नेमकं कारण कळतच नव्हतं. त्याला एवढं कळलं की त्याच्या कंजूस आणि कटकट्या स्वभावाचा त्रास होतोय.

“मी बोलतो श्रेयससोबत..”

381 thoughts on “हस्तक्षेप-3”

  1. Wow, incredible blog structure! How long have you ever been running a blog for?
    you made running a blog look easy. The overall look of your site is magnificent, as well as the content material!
    You can see similar here sklep

    Reply

Leave a Comment