हस्तक्षेप-1

“आम्ही एकत्र राहत नाही आता”

श्रेयसचे हे वाक्य ऐकताच त्याच्या मित्राला- ओमला धक्काच बसला.

“हे कसं शक्य आहे? मीच या दोघांनी एकत्र यावं म्हणून पुढाकार घेतला होता, दोघेही एकमेकांसाठी बनलेले होते हे स्पष्ट दिसत होतं. लग्नानंतर सुद्धा इतके छान राहत होते दोघे, मग हे अचानक काय झालं??”

ओमला धक्का बसला तसं त्याच्या बायकोने त्याला विचारलं,

“काय हो कोणाचा फोन होता?”

“श्रेयसचा..”

“काय म्हटले भाऊजी?”

“तो आणि सिया आता एकत्र राहत नाहीत..”

ओमच्या बायकोलाही तितकाच धक्का बसला,

“अहो हे कसं शक्य आहे? त्या दोघांना पाहून असं वाटायचं की जोडपं असावं तर असं..किती प्रेम होतं दोघांत, किती समजूतदारपणा होता…असं काय झालं की ते दोघे एकत्र राहत नाहीये ?”

“मलाच कळेनासं झालं आहे, त्याला भेटलो की मगच सविस्तर कळेल..”

ओमने त्याला भेटून सविस्तर गोष्टी विचारायचं ठरवलं…

ओमचं मन भूतकाळात हरवलं, कॉलेजमध्ये श्रेयस, सिया आणि ओम..एकाच वर्गात. श्रेयस आणि सिया दोघेही खूप active. कॉलेजमधील सर्व स्पर्धा, सर्व कार्यक्रमात अग्रेसर. ओम आणि सिया एकाच बिल्डिंगमध्ये राहत. लहानपणापासून एकत्र वाढलेले दोघेही, ओम कायम सियाकडे राखी बांधायला जायचा.

********

44 thoughts on “हस्तक्षेप-1”

Leave a Comment