सुशिक्षित 2

आई वडिलांनी चांगलं सुशिक्षित आणि सभ्य सासर शोधलं होतं,

सासू मोठ्या हुद्द्यावर आणि सासरे व्यावसायिक..

घरात सर्व कामांना नोकर चाकर,

त्यात मुलगा दुसऱ्या शहरात फ्लॅट घेऊन राहत असे,

तोही त्याचा स्वतःचा..

सुशिक्षित घरात मुलगी दिली तर मुलीला तिचं करियर करता येईल या जाणिवेने आई वडिलांनी आनंदाने लग्न लावून दिलं..

कार्तिकी आणि आनंद, दोघेही त्याच्या फ्लॅटवर राहायला आले,

कार्तिकीला फारसा स्वयंपाक येत नसे, आनंद आधीपासूनच एकटा राहत असल्याने त्याला सगळा स्वयंपाक अगदी साग्रसंगीत येई…

त्यामुळे दोन्ही वेळचा स्वयंपाक तो खुशीने करत असे,

कार्तिकीला अजून काय हवं होतं,

तिनेही जवळच नोकरी शोधली आणि दोघेही नोकरीवर जाऊ लागले,

कार्तिकी घरकामात फारशी चांगली नव्हती पण ती एक चांगली कलाकार होती,

दारात रांगोळी काढणं, घर सजवण हे काम ती आवडीने करे..

सुट्टीच्या दिवशी अचानक न सांगता सरप्राईज म्हणून सासूबाई घरी आल्या आणि तिला घामच फुटला,

कारण आनंद स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होता आणि कार्तिकी हॉल मध्ये पेपर वाचत बसलेली..

सासूबाईंनी सगळं पाहिलं पण त्या काहीही बोलल्या नाही,

संध्याकाळी सासूबाईंसमोर शोभा नको म्हणून कार्तिकी स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरु लागली,

तेवढ्यात आनंद तिथे आला आणि तिला म्हणाला,

“अगं कोबी अशी चिरु नकोस, लवकर शिजणार नाही..”

“हळू बोल..” कार्तिकी म्हणाली..

पण बाहेर ऐकू गेलं आणि सासूबाई धावतच आत आल्या,

त्यांनी कार्तिकीला ऐकवायला सुरवात केली..
*****

भाग 3 अंतिम

https://irablogging.in/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4-3-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/

1 thought on “सुशिक्षित 2”

Leave a Comment