सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 1

 

“सर सही देत नाहीये यार…लास्ट सबमिशन आहे…एका सही साठी अडून राहिलंय..”

“सकाळपासून ताटकळत बसलोय..दर वेळी गेलो की सर म्हणतात नंतर या..”

“काय मिळतं यांना असं विद्यार्थ्यांना ताटकळत ठेऊन??”

“यावर एकच उपाय..”

“श्रद्धा…”

“कुठेय ती..??”

“बोलवा तिला..”

सगळेजण श्रद्धा ला शोधतात…1st फ्लोअर वरून खाली पार्किंग मध्ये बघतात..

“दहा झाल्या फक्त…अजून 40 बाकिये..”

श्रद्धा समोर 4 मुलं उठाबशा काढत असतात…

“ताई सोडून दे ना…पुन्हा नाही करणार..”

“चुकीला माफी नाही..”

“अरे देवा…ही पोरं नवीन आहेत वाटतं…यांना माहीत नाही वाटतं श्रद्धा कोण आहे ते…”

“ते मरू दे…श्रध्दा… श्रद्धा…”

विद्यार्थी वरूनच आवाज देतात तशी ती वर बघते…

“काय झालं आता??”

“बोंब झालीये…”

“चला..दुसरी भानगड सोडवा आता..”

श्रद्धा वर जाते, मुलं तिला सगळी हकीकत सांगतात…श्रद्धा डोकं लावते आणि मुलांना सांगते..

“तुम्ही एकच काम करा…प्रिन्सिपल च्या ऑफिस बाहेर सगळे मित्र जमा करून उभं रहा…आणि सुशांत, तू सर्वात पुढे… एक भलामोठा कागद हातात घेऊन उभं राहायचं..”

“अगं सही हवीय फक्त…”

“श्रद्धा सांगतेय ते ऐक रे सुश्या…. बरं बरं… पण सही मिळेल ना आज फाईल वर??”

श्रद्धा रोखून त्याचकडे बघते..

“ओह…सॉरी सॉरी…”

श्रद्धा तडक त्या प्रोफेसर कडे जाते…खिशातून रुमाल काढते..

“सर…”

दळवी सर दचकतात…मोबाईल बाजूला ठेऊन तिच्याकडे पाहतात..

“ए..काय झालं रडायला??”

“सर तुम्ही कॉलेज सोडून जाऊ नका प्लिज…”

“मी कुठे सोडून जातोय??”

“पण तुम्हाला कॉलेजमधून काढण्याचा कट शिजतोय…”

“काय??” खिशातून रुमाल काढून घाम टिपत दळवी सर म्हणतात…

“होय सर…तुम्ही लेक्चर ला मोबाईलवर टाईमपास करतात, विनाकारण कुणाचंही नाव घेतात, syllabus पूर्ण करत नाही असे सर्व खरे… i mean खोटे आरोप मुलांनी केलेत…एक अर्ज लिहिलाय, तुम्हाला कॉलेज मधून रेस्ट्रीकेट करायचा…आणि सर्वांच्या सह्या झाल्या आहेत..”

“तू सुद्धा केलीस सही??”

“नाही सर…तुमच्यासारख्या हुषार, तडफदार, मनमिळाऊ आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाची कॉलेज ला गरज आहे….मी सही केली नाही…”

“अरे देवा…आता काय करू मी..”

“माझ्यासोबत चला..”

श्रद्धा त्यांना प्रिन्सिपल ऑफिस जवळ नेते..बाहेर प्रचंड गर्दी आणि सुशांत च्या हातातला अर्ज त्यांना दिसतो…

ते मुलांजवळ जातात..

“मुलांनो…तुम्हाला काहीही अडचण आली…अगदी पैशाचीही गरज पडली तर मला सांगा…मी सदैव तुमच्या मदतीला तत्पर आहे…”

तापट अश्या दळवी सरांचं अवसान पाहून सर्वच चाट पडले…

सुशांत पुढे येऊन म्हणतो…

“सर तेवढी सही फक्त…”

“एवढंच ना…सर्वांनी फाईल आना बरं… किती सह्या करायच्या आना…आज रात्र झाली तरी चालेल पण माझ्या विद्यार्थ्यांना मी ताटकळत ठेवणार नाही…”

सुशांत च्या हातातलं भलामोठा कागद पाहुन ते बोलतात..

सर तिथेच ठाण मांडून बसतात…सर्वांच्या फाईल वर सह्या होतात…..मुलं सुटकेचा निश्वास टाकतात…..

“तर…मुलांनो…पाहिलंत सर किती मदत करतात ते?? आता सर्वांनी आपला अर्ज मागे घ्या अन घरी जा..”

श्रद्धा सर्वांना बोलते..

“कसला अर्ज?”मुलं हळू आवाजात एकमेकांत कुजबुजतात….

“अर्ज…” श्रद्धा मोठे डोळे करून त्यांना इशारा करते..

“हो…होहो….चला रे पोरांनो घरी..”

आणि अश्या प्रकारे श्रद्धा तापट आणि आळशी प्रोफेसर ला गुंडाळून ठेवते…

अश्या कितीतरी वाईट वागणाऱ्यांना तिने गुंडाळून ठेवलं होतं…

पण गंमत तेव्हा होते जेव्हा ती लग्न करून सासरी जाते आणि अंधश्रद्धेला बळी पडलेल्या आपल्या सासूला गुंडाळते आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी उघडते….
नाव श्रद्धा …अन अंधश्रद्धेच्या बाबतीत प्रचंड चीड..

क्रमशः

part 2

https://www.irablogging.in/2020/11/swag-2.html

part 3

https://www.irablogging.in/2020/11/swag-3.html

part 4

https://www.irablogging.in/2020/11/swag-4.html

part 5

https://www.irablogging.in/2020/11/swag-5.html

part 6

https://www.irablogging.in/2020/11/swag-6.html

part 7

https://www.irablogging.in/2020/11/swag-7.html

part 8

https://www.irablogging.in/2020/11/swag-8.html

part 9

irablogging.in/2020/11/swag-9.html

part 10

https://www.irablogging.in/2020/11/swag-10.html

Leave a Comment