सारं काही तिच्याससाठी भाग 10 ©Manisha Parab

भाग -10

मोहन आणि शालिनी कॅबिनच्या बाहेर येतात, मोहन तिला तिचा डेस्क दाखवतो..आणि काम समजावून सांगतो..

शालिनी कामात हुशार असल्याने तिने कामाची पद्धत चटकन पकडली होती..

विशाल च्या कॅबिनच्या सामोर शालिनीचा डेस्क असतो..

काही वेळानंतर…

विशाल रिसिव्हर उचलतो आणि तिला कॅबिन मध्ये बोलावून घेतो…

” आत येऊ का सर..? ” शालिनी कॅबिनचा दरवाजा नॉक करते..

” ये ना प्लीज.. ” विशाल बोलतो..

” मोहन सांगत होते की तुम्ही साईट वर मला घेऊन जात आहात..? ” शालिनी बोलते..

विशाल घड्याळात पाहतो, घड्याळात चार वाजलेले असतात, ” हो… म्हणजे तुला साईटच पण नॉलेज भेटेल.”

” तरी साधारण किती वाजतील…? नाही म्हणजे मि म्हणाली ना की मला सहाच्या नंतर नाही थांबता येणार.. “
शालिनी बोलते..

” ठीक आहे… पण आता आपण निघूया… आणि सहा वाजता मि तुला तुझ्या घरी ड्रॉप करेन… मग तर झालं..!” विशाल बोलतो..

” नाही नको, मि जाईन… ” शालिनी त्याला बोलते.

” ह्म्म्म बरं ठीक आहे, मग घरा पासुन थोडं लांब सोडेन चालेल का ? ” विशाल विचारतो..

” नको… अहो सर मि जाईन…” शालिनी बोलते..

” बरं आता तु नाही म्हणतेस तर मि जबरदस्ती नाही करणार.. ” विशाल बोलतो..

आणि दोघंही साईड वर जाण्यासाठी निघतात..

साईड वर पोहचतास विशाल तिला साईड विषयी समजावून सांगतो, दाखवतो.. पूर्ण माहिती देतो..

शालिनीच लक्ष पूर्णपणे घड्याळावर असत, सहा वाजतात.
” सर आपण निघूया का ? सहा वाजले.. ” शालिनी घड्याळ दाखवते…

” सॉरी पण एक अजुन दहा मिनिट थांब, निघूया.. ” विशाल तिला रिकवेस्ट करतो..

साईड वर मिटिंग चालु असते.. विशाल चं लक्ष जातं, ती अस्वस्थ असते.. विशाल तिला विचारतो, ” तु ठीक आहेस ना..? तु अस्वस्थ दिसतेय काय झालं ? ” विशाल तिला अनेक प्रश्न करतो..

” नाही सव्वा सहा झाले, माझं खुप महत्वाचं कामं आहे ते नाही केलं तर प्रॉब्लेम होईल.. ” शालिनी बोलते…

” बरं बरं.. तु जा… पण हा उद्या ऑफिसला ये पण.. ” विशाल बोलतो..

शालिनी निघुन जाते, विशाल ही साईड वरून घरी जातो..

दारावरची बेल वाजवतो, त्याची आई दार खोलते..
विशाल तिला थकलेला दिसतो, ” आज कामं भरपूर होतं वाटतं..? ” विशालची आई त्याला पाणी देते..

तो सोफ्यावर बॅग टाकुन पसरून बसतो, ” आई गं आई… हो साईड वर मिटिंग होती आज.. “

विशाल पाणी घेतो आणि फ्रेश व्हायला जातो..

विशाल फ्रेश होऊन बाहेर येतो, जाऊन सखीला मिठी मारतो. ” पप्पा आज खुप खुश दिसतोय तु..? ” सखी त्याला विचारते..

” हो बाळा.. ” विशाल आणि सखी मध्ये खुप गप्पा गोष्टी रंगतात…

विशाल बाल्कनीत उभा असतो, हातात ड्रिंक चा ग्लास असतो.. विशाल जेव्हा खुप थकतो आणि विचारात असतो तेव्हा मात्र तो ड्रिंक करतो..

” हे काय… ड्रिंक कशाला…? आणि इतक्या कसल्या विचारात आहेस..? ” आई त्याला विचारते.

” ऑफिस बाकी काही नाही.. ” तो हातातला ग्लास बाजूला ठेवतो..

आईला त्याच्या मनात काय चाललंय हे कळत, ती त्याला विचारते…” सीमा चा तर विचार नाही आहे ना तुझ्या डोक्यात ?…पण एक व्यक्ती आहे ती म्हणजे.. शालिनी.. बरोबर..? “

” हो आज तिचा ऑफिस चा पहिला दिवस होता.. ” विशाल बोलतो..

” शेवटी ठेवलस ना तिला… छान, पण पुढे काय…? ह्यात इतका विचार करण्यासारखं काय…? ” आई विचारते..

” हेच की तिची खुप महत्वाची अट होती,, ती म्हणजे सहाच्या नंतर ऑफिस ला थांबणार नाही… मग किती ही काहीही होऊ दे.. ” विशाल सांगतो..

पुन्हा ड्रिंक चा ग्लास तोंडाला लावतो, ” मग तु अट मान्य केलीस..? ” आई विचारते…

” हो.. करावीच लागली… मला माहित नाही का.. पण खुप विचित्र अट तिने घातली.. आणि मला मान्य करावंच लागलं..” विशाल आई जवळ मन मोकळ करतो.

” तुला ती आवडली किंवा तु तिच्या प्रेमात तर पडला नाही ना..? ” आई त्याला त्याच्या मनातलं विचारते..

क्रमश…

20 thoughts on “सारं काही तिच्याससाठी भाग 10 ©Manisha Parab”

  1. Hey there, I think your site might be having browser compatibility issues.
    When I look at your website in Chrome, it looks fine but when opening in Internet Explorer,
    it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up!
    Other then that, wonderful blog!

    Reply

Leave a Comment