“अगं नवरा एवढं म्हणतोय तर घे की..”
“नको, मी घेईन नंतर”
नुकतंच लग्न झालेली लहान बहीण आपल्या मोठ्या बहिणीकडे काही दिवस राहायला आलेली,
लहान बहीण नवीन नवरी, नव्या घराचं, सासरच्यांचं, नवऱ्याचं कौतुक सांगता थकत नव्हती, मोठ्या बहिणीलाही बरं वाटायचं ऐकून,
लहान बहीण तिच्या जिजाजींची लाडकी, त्यांनी तिला आपल्या बहिणीसारखीच वागणूक दिलेली,
ती आली आहे म्हटल्यावर त्यांनी तिला आवडेल असं जेवण बनवायला लावलं, शहरात फिरवून आणलं, तिच्या आवडीची खरेदी करायला नेलं,
खरेदीला गेले असता लहान बहिणीने पुरेपूर खरेदी आपल्या दाजींकडून करून घेतली,
मोठ्या बहिणीलाही म्हणत होते, “अगं तुझी लहान बहीण इतक्या छान साड्या घेतेय, तुही काढ की एखादी”
“हो ना ताई, ही बघ..गुलबक्षी रंगाची साडी, उठून दिसेल तुझ्यावर”
दोघांनी खूप आग्रह केला तरी मोठी बहीण घ्यायला काही तयार नव्हती,
सर्वजण खरेदी करून घरी आले, मोठ्या बहिणीने स्वयंपाक केला,
सर्वजण जेवले, दोघी बहिणी रात्री शतपावली करायला बाहेर निघाल्या,
“ताई एक विचारू? जीजू तुला एवढा आग्रह करत होते तरी तू काही खरेदी का केली नाहीस? तुमचं काही बिनसलं आहे का?”
“छे गं..”