शापित अप्सरा भाग 43

शापित अप्सरा भाग 43मागील भागात आपण पाहिले की सुगंधा अट घालते की विवाह झाल्यावरच ती इनामदार महालात येईल. सुभानराव तिची अट पूर्ण करतात. सुगंधा विवाह करूनच साजगावची वेस ओलांडते. आता पाहूया पुढे.सगुणाबाई तबक दासीच्या हातात सोपवून अचानक निघून गेल्या. गुणवंताबाई प्रचंड रागावल्या होत्या तेवढ्यात त्यांनी खंडोजीच्या मागावर पाठवलेली माणसे परत आली. त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून त्या प्रचंड संतापल्या.
काहीही झाले तरी सगुणा त्यांच्या भावाची मुलगी होती. तेवढ्यात इनामदार सुभानराव महालाच्या प्रवेशद्वारावर आल्याची वर्दी आली.
“खबरदार कोणी औक्षण करायला जाल तर!.” गुणवंताबाई कडाडल्या.सुगंधा नववधूच्या वेशात तशीच उभी होती. तेवढ्यात केशर स्वतः पुढे झाली. तिने दोघांना औक्षण केले. सुगंधा महालाचा उंबरा ओलंडून आत आली. सुभानरावांनी तिची आपल्या खास दालनात व्यवस्था केली. केशर आणि इतरांना राहायला स्वतंत्र व्यवस्था केली. इकडे सगुणाबाई प्रचंड उद्विग्न अवस्थेत दालनात येरझाऱ्या घालत होत्या. तेवढ्यात गुणवंताबाई आत आल्या.”आत्या,शेवटी काय लागले आमच्या हाती?” सगुणाबाई रागाने म्हणाल्या.”सगुणा,अशा कितीतरी जणी येतात आणि जातात. इनामदार घरातील स्त्रियांना हे नवीन नाही.”गुणवंताबाई समजूत काढू लागल्या.” पण माझ्या घरात आजवर कोणी घुसले नव्हते.”ओठ दाताखाली दाबत सगुणाबाई बोलल्या.”सगुणा,कधीतरी हे होणारच होते. अशा किती जणी आल्या पण कोणीच ह्या महालात इनामदार स्त्रियांची जागा घेऊ शकले नाही. कोणतीही दुसरी स्त्री इथे टिकत नाही.” गुणवंताबाई हसत म्हणाल्या.”म्हणजे? समजले नाही?”सगुणाबाई साशंक स्वरात विचारू लागल्या.”सगुणा,अशा स्त्रियांना बाहेर काढायचे कसब असायला हवे. मी आहे ना! लवकरच ही सुगंधा महालातून बाहेर जाईल आणि नाहीच गेली तर जीवनातून जाईल.”गुणवंता बाईंचे डोळे लाल झाले होते.” आत्या,खरेच असे होईल?”सगुणाबाई त्यांना बिलगल्या.”पोरी मी तुला शब्द देते. सुगंधाला लवकरच इथून बाहेर जावे लागेल.”सगुणाबाई हळुहळू शांत झाल्या.इकडे दालनात आल्यावर सुगंधाने आधी देवघरात जाऊन प्रार्थना केली.”सुगंधा,तुम्ही खुश आहात ना?”सुभानराव म्हणाले.”आजवर उघड्यावरच जीवन जगत आले. आज तुम्ही मला एका संसारी स्त्रीचे सुख दिले आहे. त्या बदल्यात माझे प्राणही मागितले तर देईल.”सुगंधा हळूच त्यांच्याजवळ येऊन बसली.त्यानंतर कितीतरी वेळ ते दोघे बोलत होते. बोलता बोलता कधी झोप लागली समजले देखील नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी सुभानराव जरा उशिराने जागे झाले. बाजूला सुगंधा नव्हती. ते उठून बसले इतक्यात सुगंधा स्नान करून येताना दिसली.
ओले केस,चेहऱ्यावर त्यातून सांडलेले थेंब, अंगाशी घट्ट असलेली साडी आणि सोबत अप्रतिम लावण्य. सुभानराव तिच्याजवळ गेले.”असे काय बघताय?”सुगंधा लाजून खाली पाहू लागली.सुभानरावांनी हळूच तिची हनुवटी धरून वर उचलली. तिच्या मनमोहक टपोऱ्या डोळ्यात स्वतः ला हरवून ते तसेच बघत राहिले.”अहो! सोडा आता. बाहेर जायचं आहे ना?”सुगंधा दूर होऊ लागली.त्यांनी अचानक तिला स्वतः कडे ओढले.”सुगंधा, स्त्रीदेह अनेक भोगले परंतु जी ओढ तुझ्यासाठी आहे ती अलौकिक आहे.”त्यांनी हळूवार तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि झरकन निघून गेले.एक पुरुष असा जवळ आलेला सुगंधाला नवीन होते. आज सुभानरावांनी तिला पूर्ण जिंकले होते. संयम आणि प्रेम यांचा विजय झाला होता.थोड्याच वेळात सुभानराव तयार झाले. तेवढ्यात एक दासी निरोप घेऊन आली.”मालक,धाकल्या मालकीणबाईंनी बोलावल हाय.””सगुणाबाईंना सांगा आम्ही आज येणार नाही.”सुभानराव म्हणाले.”माझे एक ऐकाल?”सुगंधा हळूवार आवाजात म्हणाली.”सांगून तर बघ.”इनामदार खट्याळ हसले.”तुम्ही थोरल्या बाईंना भेटायला जा. मी आले आणि त्यांच्यात अन तुमच्यात दुरावा आला. असे मला चालणार नाही.”सुगंधा एकेक शब्द काळजीने उच्चारत होती.दासी तिथेच थांबून होती.”इनामदार येत आहेत असा निरोप दे.”सुगंधाने दासीला निरोप घेऊन पाठवले.सुभानराव सगुणाबाईंच्या दालनात आले.”इकडची वाट लक्षात आहे तर?”सगुणाबाई म्हणाल्या.”सगुणाबाई तुमच्या हक्कावर काहीच गदा येणार नाही. सुगंधा येण्या अगोदर असलेले स्थान तुमचेच राहील.”सुभानराव म्हणाले.”अर्थातच, एक तमाशात नाचणारी आमची जागा घेऊच शकत नाही.”सगुणाबाई फणकाऱ्याने म्हणाल्या.”खबरदार! सगुणाबाई. आता त्या आमच्या पत्नी आहेत.”इनामदार धारदार आवाजात म्हणाले.”अशा बायका फक्त शरीराची भूक भागवू शकतात. संसार नाही करू शकत.”सगुणाबाई बेभान होऊन बोलत होत्या आणि पुढच्या क्षणी सनकन त्यांच्या कानफटात मारून सुभानराव दालनातून बाहेर पडले.
घडलेल्या घटनेमुळे दोन क्षण सगुणाबाई सुन्न झाल्या. आपल्यासोबत असे काही होईल याचा स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता. सगुणाबाईंनी आपला एकही अश्रू सांडू दिला नाही.”ज्या सुगंधामुळे आज हा अपमान झाला तिला मी सोडणार नाही.”सगुणाबाईंनी मनाशी निर्धार केला.एक सुडाची कहाणी नकळत आकार घेत होती. इकडे सुभानराव लगेच परत आलेले पाहून सुगंधा अचंबित झाली. परंतु त्यांची एकंदर मनस्थिती पाहून सुगंधा शांत राहिली. थोडा वेळ गेल्यावर तिने शांतपणे सुभानरावांना खायला दिले. तेवढ्यात देवळात जाण्यासाठी निरोप घेऊन शिपाई आला.”सुगंधा,तुम्ही चला बरोबर.”सुभानराव म्हणाले.”नाही,आता ह्या सुंदर उत्सवी वातावरणाला भांडणाचे गालबोट नको.”सुगंधाचा समजूतदरपणा पाहून सुभानराव आनंदित झाले.आपले मन तिच्याकडे ओढले जाण्याची कारणे त्यांना आता उमगत होते. सुभानराव एकटेच देवळात जायला बाहेर पडले.सुभानराव बाहेर गेलेले पाहताच केशर सुगंधाला भेटायला आली.
“सुगंधा,आपल्याला अमर होण्याचा ग्रंथ सुरक्षित ठिकाणी ठेवायला लागेल.””हो,त्या ग्रंथाचे रहस्य सांगणारे शिल्प आणि तो दिव्य ग्रंथ कोणाच्याही हातात पडायला नको.””हे काम झाल्यावर मी हिमालयात निघून जाईल.””काय? केशर मला आठवते तेव्हापासून तू माझ्यासोबत आहेस. आता ह्या वळणावर मला सोडून जाणार?””सुगंधा,मी इथे नाही राहू शकणार. तुला तुझे आयुष्य जगण्यासाठी आमच्यापासून दूर व्हावेच लागेल.””पण केशर माझ्यात असलेला तो अंश उफाळून आला तर?””त्यासाठीच मी तुला काही मंत्र शिकवणार आहे. तसेच तुला इथे सांभाळून राहावे लागेल.””का? मला कोण हानी पोहोचवू शकेल?”” सुगंधा,ह्या वाड्यात प्रेमविवाह करून आलेली एकही स्त्री जिवंत बाहेर गेलेली नाही. किंबहुना त्या स्त्रियांचे काय झाले कोणालाच माहीत नाही. गेल्या अनेक पिढ्या हे असेच चालू आहे. त्यासाठी तुला सावध राहावे लागेल.””केशर,आपण योगिनी आहोत.””हो,पण आपल्या काही मर्यादा आहेत. झोपेत असताना,साधना सुरू असताना, ऋतुमती असताना आणि गर्भार असताना योगिनी त्यांच्या पूर्ण शक्ती वापरू शकत नाही.””केशर,म्हणूनच तू नको जाऊस.””सुगंधा,इथे आम्ही थांबलो तर मग तू सामान्य जीवन जगू शकणार नाहीस. पुढील काही दिवस मी तुझ्यासोबत आहे. आता तू आराम कर.”केशर निघून गेली.गुणवंताबाई अस्वस्थ होऊन दालनात येरझाऱ्या घालत होत्या. समोर त्यांचे यजमान पक्षाघात झालेल्या अवस्थेत पडलेले होते. त्यांना पाहताच मस्तकाची शीर रागाने उडू लागली. त्या शांतपणे हातात पाण्याचा ग्लास घेऊन पलंगाजवळ गेल्या.”इनामदार,आज पुन्हा तीच वेळ आलीय जी वीस वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी जे झाले तेच आताही होईल. जशी तुमची पुतळा संपली तशीच सुगंधा संपेल.”सगुणाबाई क्रूर हसत म्हणाल्या.दोन उष्ण अश्रू थोरल्या इनामदारांच्या गालावरून ओघळले.”तुम्ही रडण्याशिवाय काहीच करू शकणार नाही.”पाण्याचा ग्लास तसाच लांबवर ठेवून आपले मंगळसूत्र घालून गुणवंताबाई बाहेर पडल्या.”आई जगदंबे,आम्हा पुरुषांच्या प्रेमाची किती अप्सराना शिक्षा होणार? सुगंधाचे रक्षण कर आई.”थोरले इनामदार असहाय्य स्थितीत प्रार्थना करत होते.सुभानराव दिवाणखान्यात एकटेच आलेले बघून कमळा हसली.”आता,पुजेल एकटं बसणार व्हय. न्हाय मंजी दोन दोन बायका असताना?””खबरदार,त्यांची पत्नी एकच. ती म्हणजे आम्ही सगुणाबाई इनामदार.”वरून येताना सगुणाबाई कडाडल्या.”महालात लपवल म्हणून कोंबड झाकत नसत जाऊबाई.”अंतोजीरावांची थोरली पत्नी हसून म्हणाली.”तुळसाबाई,कोणाशी बोलताय?”सगुणाबाई चिडल्या.”तुमच्याशी,ज्यांना आमच्यासारखेच त्यांच्या नवऱ्याने टाकले आहे.” तुळसाबाई नथ सावरत म्हणाल्या. तेवढ्यात गुणवंताबाई येतअसलेल्या पाहून सगळ्या गप्प बसल्या.आज देवीच्या उत्सवाचा मुख्य विधी होणार होता. त्यानंतर देवीची मूर्ती नगर प्रदक्षिणा करून मग पुढील तीन दिवस संपूर्ण गाव उत्सव साजरा करणार होते. गुणवंताबाई समोर येताच शास्त्री त्यांना नमस्कार करायला उठले.”बस शास्त्रीबुवा आता इथे नमस्कार करता आणि काल आम्हाला न आवडणारे काम करून आलात.””बाईसाहेब, इनामदारांच्या गादीच्या वारसाचा हुकूम आम्हाला ऐकावाच लागणार.””अस्स,मग आणखी एका अप्सरेला बळी जाताना पाहायला तयार रहा.””बाईसाहेब सगळ्याच अप्सरा केवळ सौंदर्य घेऊन आलेल्या नसतात. तेव्हा आपणही सबुरीने घ्या.”असे सांगून शास्त्री आत मंदिरात निघून गेले. शास्त्री असे म्हणाले याचाच अर्थ नक्कीच काहीतरी वेगळे आहे. ते आधी शोधायचा निश्चय करून गुणवंताबाई मंदिरात शिरल्या.सुगंधा सुरक्षित राहील का?गुणवंताबाई नेमके काय करतील?सुभानराव आणि सुगंधा यांचे प्रेम कसे बहरेल?वाचत रहा.शापित अप्सरा.©®प्रशांत कुंजीर.

26 thoughts on “शापित अप्सरा भाग 43”

 1. Howdy! Do you know if they make any plugins to help with SEO?

  I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but
  I’m not seeing very good success. If you know of any please share.
  Thanks! You can read similar blog here: Sklep online

  Reply
 2. Good day! Do you know if they make any plugins to assist with SEO?
  I’m trying to get my website to rank for some targeted
  keywords but I’m not seeing very good results.
  If you know of any please share. Kudos! You can read
  similar article here: Backlink Building

  Reply
 3. Wow, incredible weblog layout!

  How long have you ever been running a blog for?
  you made blogging look easy. The overall glance of your web site is wonderful, as smartly as the
  content material! You can see similar here prev next and it’s was wrote by
  Bryan73.

  Reply
 4. Woah! I’m really digging the template/theme off this site.
  It’s simple, yet effective. A loot of times it’s very difficult to get that “perfect balance” between usanility
  and visual appeal. I must say that you’ve
  done a great job with this. Also, the blog loads super fast for me on Chrome.

  Excellent Blog!

  Reply

Leave a Comment