वाचा-2 अंतिम

ती घरात एकटी होती, काहीवेळाने एक कामवाली आली, तिने हिला पाहिलं आणि तिला हिची दया आली..तिने तिला जेवायला वगैरे बनवून दिलं आणि सांगितलं की नवरा येईल म्हणून..

नवरा आला तसा दोन माणसांना घेऊनच, दुसऱ्या खोलीत त्यांचं बोलणं सुरू होतं… तिला खोलीत काही कागदपत्रे सापडली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली,

मानवी अवयवांची तस्करी ही लोकं करत असत,

त्याचाच बकरा तिला बनवण्यात आलेलं,

या माणसाचे असे असहाय अनेक मुलींशी लग्न झालेली आणि त्या नंतर गायब झालेल्या

नवरा खोलीत आला तशी ती भडकली,

हातवारे करून, संताप करून त्याला मारू लागली,

त्यानेही शिवीगाळ केली आणि तो म्हणाला,

“आई बापाला जड झालेली तू, रहा इथे गपगुमान… काही नाही करू शकत तू..”

तिच्याकडून तिचा फोन त्याने हिसकवला… आणि तिला खोलीत बंद केलं..

ती हतबल झाली, पण धीराने परिस्थिती हाताळली,

खिडकीतून मोलकरीणला हात दिला आणि तिला एक मोबाईल देण्याची विनंती केली..

मोलकरीण तिला मदत करत होती,

मोबाईल मधून तिने सर्वप्रथम पोलिसांना मेल पाठवला, घरच्यांना मेल पाठवला..मेसेज पाठवला…आणि मोलकरणीला सांगितलं हातवारे करून मोबाईल दुसऱ्या खोलीत तासभर ठेवायला सांगितला…त्यात तिने रेकॉर्डिंग सुरू केली होती..

मोलकरणीने तसंच केलं,

दुसऱ्या खोलीत तिचा मोबाईल तिने ठेवला, जिथे हीच नवरा आणि बाकीची काही माणसं बोलत होती,

मोलकरणीचं काम आटोपलं तसं तिने मोबाईल घेतला आणि निघून गेली..

काही वेळाने तिथे पोलीस आले, तिचे आई वडील आले..

तिचा नवरा एकदम नाटक करू लागला..

“फसवलं हो मला यांनी, या मुलीची मानसिक स्थिती ठीक नाही असं समजलं, मला लाथा बुक्क्यांनी मारू लागली..तिला शेवटी खोलीत बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता..”

पोलिसांनी तिला खोलीतून बाहेर काढलं,

मोलकरिन मोबाईल घेऊन आली तशी तिने तिच्यातील रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवली,

त्यात तिचा नवरा आणि त्याचे काही मित्र स्पष्टपणे तिच्या शरीरातुन अवयव काढून त्याच्या तस्करीबद्दल बोलत होते,

पोलिसांनी तडक त्या माणसाला चोप दिला आणि अटक केली,

त्याच्या सर्व साथीदारांनाही अटक झाली,

आई वडील रडायचे थांबत नव्हते, पण तिने त्यांना धीर दिला आणि सर्वजण आपापल्या घरी परतले,

ती मुकी असली तरी तिचं शिक्षण आणि तिचं चातुर्य खूप काही बोलून गेलं…शिक्षण हीच माणसाची वाचा असते..कठीण प्रसंगात  हीच वाचा फोडता येते…

समाप्त

2 thoughts on “वाचा-2 अंतिम”

 1. Спины за регистрацию без депозита с выводом

  Что такое бездепозитные бонусы в казино?
  Бездепозитные бонусы top10bonusov2.fun – это невероятная возможность попробовать свою удачу в играх казино, получив бесплатные деньги от заведения. Используя бездепозитные бонусы, вы не рискуете своими средствами, но при этом можете выиграть настоящие деньги. top10bonusov2.fun Это отличное предложение для новичков, которые только начинают свой путь в мире азарта, или для опытных игроков, которые хотят испытать новые стратегии и тактики без риска потерять свои сбережения.
  Как получить бездепозитные бонусы? top10bonusov2.fun
  Процесс получения бездепозитных бонусов очень прост и легко доступен каждому игроку. Многие казино предлагают специальные акции и промо-коды, которые позволяют получить бездепозитные бонусы. Для этого достаточно зарегистрироваться на сайте казино и активировать промо-код при регистрации или в личном кабинете.
  Однако, стоит учесть, что каждое казино имеет свои правила и условия для получения и использования бездепозитных бонусов. Некоторые заведения требуют подтверждение личности, отправку документов или прохождение верификации перед началом игры. Не забывайте внимательно читать условия каждого бонуса, чтобы избежать неприятных сюрпризов.

  Reply

Leave a Comment