वाचा-1

तिला बोलता येत नसल्याने तिच्या लग्नाला खूप अडचणी येत होत्या,

एक तर स्थळ मिळत नव्हतं, त्यातही एखादं मिळालं तर त्यांच्या अवास्तव अपेक्षा..

तिला तिच्या आई वडिलांनी खूप शिकवलं होतं, मास्टर्स करून आता Phd करत होती ती.

इतर मुलींसारखं होणाऱ्या नवऱ्याची स्वप्न तिला बघता येत नसायचे,

स्वप्नातला राजकुमार वगैरेची कधी स्वप्नही तिच्या मनाने बघू दिली नाही,

“आपण अबोल, आपल्याला कोण पदरात घेणार..”

हाच समज तिच्या पक्का झालेला,

ती दिसायला खूप सुंदर होती, कॉलेजमध्ये सुरवातीला कित्येक मुलं तिच्या पाठी लागायचे,

पण जेव्हा त्यांना ती मुकी असल्याचं समजलं, तेव्हा मात्र त्यांनी ओळख न वाढवण योग्य समजलं..

तिला तरीही आशा होतीच, की कुणीतरी येईल..आपल्याला समजून घेणारं,

स्थळं यायची, दिव्यांग मुलांची,

पण तिच्या इतकं शिक्षित कुणी नसायचं,

आई वडिलांनी ठरवलं,

योग्य मुलगा मिळाला तर ठीक नाहीतर आम्ही आयुष्यभर तिला जवळ ठेऊ, स्वतःचं पोट भरू शकेल एवढं सक्षम केलं आहे तिला…

त्यातच एक स्थळ आलं,

मुलगा धडधाकट, दिसायला सुंदर, सुशिक्षित..

त्याच्या रुपात देवच आला असं आई वडिलांना वाटलं,

मुलाने लगेच मुलीला पसंत केलं,

काही विचारलं नाही की कसली चौकशी नाही,

तिला काहीतरी वावगं वाटलं, पण कोणत्या तोंडाने विचारणार?

सासर खूप दूर होतं, आई वडिलांना खूप काळजी होती, पण इतका चांगला मुलगा मिळतोय म्हटल्यावर त्यांनी बाकी कसलीही चौकशी केली नाही,

ती लग्न करून सासरी गेली,

रस्त्यातच सर्वांचं वागणं तिला खटकत होतं,

तिचा नवरा तिच्या सासूला मॅडम म्हणत होता आणि सासू मुलाला सर..

तिला काही कळेना,

तिला एका घरात नेण्यात आलं,

आल्यासरशी तिला एक खोली दिली, नवरा बाहेर निघून गेला तो दोन दिवस फिरकलाच नाही,

तिची सासू बॅग भरत होती, तिने हातवारे करून विचारलं..नवरा कुठेय..तुम्ही कुठे जाताय..

सासू फक्त हसली आणि निघून गेली,
*****


1 thought on “वाचा-1”

  1. It was great seeing how much work you put into it. The picture is nice, and your writing style is stylish, but you seem to be worrying that you should be presenting the next article. I’ll almost certainly be back to read more of your work if you take care of this hike.

    Reply

Leave a Comment