लोका सांगे ब्रह्मज्ञान-2

पण सासरी आहे त्या परिस्थितीत सुखी राहणं हेच त्या काळात रुजलेलं,

विरोध करून काढता पाय घेणाऱ्या स्त्रीला समाजात जागा नसायची,

त्याच पध्दतीनुसार ती मृत मनाने जगत होती,

देवाची कृपा म्हणून नवऱ्याची बदली झाली आणि दोघेही दुसरीकडे गेले,

सासू पासून सुटका झाली,

आता मोकळीक मिळाली,

हळूहळू भीती कमी झाली आणि ती स्वच्छंदी जगू लागली,

नवऱ्याने आता कुठे तिला स्वतःहून पाहिलं,

एरवी तिच्याकडे तो आईच्याच नजरेतून बघत होता,

तिचं शिक्षण झालेलं, त्यामुळे ती घरगुती लहान मुलांचे क्लासेस घेऊ लागली,

बरीच मुलं शिकायला आली, चांगला पैसा मिळू लागला,

सगळं चांगलं चालायचं,

पण ज्या दिवशी घरून सासूबाईंचा फोन येई त्या दिवशी नवऱ्याचं वागणं एकदम बदलायचं,

अगदी शिव्या द्यायलाही मागेपुढे पाहायचा नाही,

या सगळ्यात त्यांच्यात नवरा बायकोचं नातं कधी फुललंच नाही,

कधी दोघे मिळून बाहेर गेले नाही की कधी एकत्र फिरले नाही,

जवळच्या लग्न समारंभाला गेले तेवढंच फक्त,

दिवस सरत गेले,

स्वतःसाठी जगावं हे तिला फार उशिरा कळलं,

तिने आपल्या सोसायटीतल्या मैत्रिणींसोबत ट्रिप अरेंज केली,

15 दिवस सगळ्या यात्रेला जाणार होत्या,

सगळी तयारी झाली,

ट्रिपच्या 10 दिवस आधी तिच्या नवऱ्याने सासूबाईंना घरी आणलं,

“आईही तब्येत आता नाजूक असते, ती आपल्याकडेच राहील”

त्याने फर्मान सोडलं,

ती काही बोलली नाही,

सासूबाईंना काय हवं नको पाहिलं,

पण ते करतानाही सासूबाईंचा ठेका तसाच,

जराही बदल नव्हता,

तिने नवऱ्याला आपल्या ट्रिपबद्दल सांगितलं,

“तुला कळतं का तू काय बोलतेय?”

आता मात्र तिचा संयम सुटला,

1 thought on “लोका सांगे ब्रह्मज्ञान-2”

Leave a Comment