भाग 2
https://www.irablogging.in/2020/04/2_16.html
पुष्पा पोट धरून हसायला लागते..
“हा हा हा…मला हिचा आदर्श दाखवत होते काय…बघा बघा बघा…तुमची भाचे सून…”
मामा अन मामीचा अखेरच्या क्षणी चांगलाच पोपट झालेला…दोघांना मौन बाळगत परतन्याशिवाय पर्याय नव्हता.
“निखिल…आज तुझ्या बायकोमुळे माझी माझ्या भाऊ अन वाहिनीसमोर नाचक्की झाली….आवर तुझ्या बायकोला…नाहीतर मी आधीसारखी…”
“आधीसारखी काय..”
“मी आधीसारखी तिला वागवेन..”
“आई …तुला मी पुन्हा सांगतो…ती माझी बायको आहे, तिला जर काही त्रास झाला तर मी सहन करणार नाही..तिच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे.”
नेहमीप्रमाणे निखिल आपल्या आईला बजावतो..
पण भाऊ अन वहिनीसमोर झालेला अपमान शोभा अक्काच्या जिव्हारी लागला होता…
आता लक्ष्मी ला आपणच धडा शिकवायचा असं त्या ठरवतात…तिला त्रास झाला तरी बेहत्तर पण सुनेचं हे असलं काही सहन करणार नाही असं त्या ठरवतात…
दुसऱ्या दिवशी निखिल कामावर निघून जातो..
लक्ष्मी उठल्या उठल्या..
“ओ SB, चहाचं बघा तेवढं…”
“लक्ष्मी…बस झाली तुझी थेरं…यापुढे तुझी हमाली करणार नाही मी….सासू आहे मी तुझी…मलाच कामाला लावलेस तू??”
लक्ष्मी संतापाच्या भरात तिथून निघून जाते…सासूबाई त्यांचा आणि निखिल च्या वडिलांचा फक्त चहा बनवतात आणि त्यांना नेऊन देतात.
सासरेबुवा सगळं ऐकत असतात, त्यांना वाईट वाटतं… ते गपचूप लक्ष्मी च्या खोलीत जाऊन त्यांचा चहा तिला देतात…
“SB …तुम्ही कशाला आणलं?”
“घे बाळा…आणि जास्त विचार करू नकोस हा…तुझ्या सासूबाईंना कामाचा लोड येतो म्हणून थोडी चिडचिड होते त्यांची…”
सासरेबुवा शोभा अक्काची समजूत घालतात…
“अशी वागू नकोस गं या मुलीशी….आपली सून आहे ती…आता आजारी आहे म्हणून अशी वागतेय…आधी अशी वागायची का ती??? आणि डॉकटर म्हणाले ना की हळूहळू येईल सगळं पूर्वपदावर…”
“मला काहीएक सांगू नका…ती कशी वागली पाहिलंत ना तुम्ही? माझ्या भाऊ आणि वाहिनीसमोर माझा अपमान झाला…त्यांच्या सुनेला बोलायला कारण मिळालं ते वेगळंच…”
“आता तुझ्या भावाला सांगून यायला काय झालं होतं? तो अचानक आला अन असं झालं…जाऊदे, मी एवढंच सांगेन की सुनबाईचा त्रास होईल असं वागू नको..”
शोभा अक्कावर काहीएक परिणाम होत नाही… लक्ष्मीला जाच करायचाच असं त्या मनाशी पक्कं करतात…
दुपारी शोभा अक्का मुद्दाम जेवण बनवत नाहीत…लक्ष्मीजवळ येऊन सांगतात..
“आजपासून सगळा स्वयंपाक तू करायचास… येतो तुला..मला माहितीये.”
लक्ष्मी काहीही बोलत नाही…फक्त एक फोन फिरवते..
“भाई…आज खाना घर पे भेज दे…क्या बोला? 3 प्लेट?…नही रे बाबा…सिर्फ 2…”
“2 कोणाला?”
“मला आणि डॅड ला…”
“मी मेली काय?”
“सकाळी चहा द्यायला काय झालेलं?”
लक्ष्मी आणि सासरेबुवा पोटभर जेवून घेतात..सासरेबुवा सांगतात…
“हे बघ…आजाराने का असेना पण ती आता गुंड आहे…काहीही करू शकते…उपाशी राहायचं नसेल तर नीट वाग…”
शोभा अक्का अजून संतापतात…किचन मध्ये काहीतरी बनवायक जातात…पाहते तर काय, त्यांचं जेवण तिथे तयार होतं. .
“मेलं खोटं बोलली…”
“अगं तुला उपाशी नाही ठेवलं यात सुख मान…खोटं बोलली तेवढं दिसलं फक्त..”
“तुम्ही तिचिच बाजू घ्या फक्त..”
संध्याकाळी लक्ष्मी सासरेबुवांजवळ येते…
“डॅड… माझ्यासोबत चला..”
“कुठे? वसुली करायला? नको गं बाई…मला सवय नाही..”
“वसुली नाही ओ…. जेवायला जायचं आहे बाहेर…”
“आणि तुझी सासू?”
“त्या नाही म्हटल्या…”
“बरं चल…आणि निखिल?.”
“निखिल ला मी परस्पर हॉटेल मध्ये बोलावलं आहे..”
“बरं..”
हे तिघे हॉटेल मध्ये जातात…सासूबाईंना लक्ष्मी ने काही विचारलेलं बिचारलेलं नसतं…. सासूबाई मंदिरातुन आल्यावर बघतात तर घरी कुणीच नाही…
इतक्यात त्यांना लक्ष्मी चा फोन येतो…
“तुमचा नवरा आणि मुलगा माझ्या ताब्यात आहेत….त्यांना सुखरूप घरी पाहायचं असेल तर माझ्या काही गोष्टी ऐकाव्या लागतील…”
क्रमशः
पुढचा भाग लवकर लिहा. Plz
Bhag 4
Khupach Chan