तिने तेच केलं,
स्वाभिमान बाजूला ठेवला
ऐकत गेली,
मग सासू नणंदेचं अजूनच फावलं,
ऐकतेय म्हणून अजून ऐकवत गेल्या,
एके दिवशी तिची सहनशक्ती सम्पली,
खोलीत आली,
दार लावून घेतलं,
नवरा बेडवर लोळत होता,
त्याला खूप सुनावलं,
बायको अशी बोलतेय तेव्हा तिची बाजू समजून घ्यावी ही तिची अपेक्षा,
पण झालं भलतंच,
तो चवताळला,
खोलीतल्या वस्तू उचलून फेकू लागला,
भिंतीवर हात आपटू लागला,
त्याचं हे रूप बघून ती घाबरली,
तो मोठमोठ्याने ओरडू लागला,
आजूबाजूची लोकं बघू लागली,
तिलाच लाज वाटली,
“अहो हळू बोला, आजूबाजूची लोकं बघताय”
तिने पटकन खिडक्या बंद केल्या,
पण त्याला कसलंही भान नव्हतं,
आरडाओरड सुरूच होता,
“आपला वाद आहे आपण आपल्यात शांततेत सोडवू, कशाला तमाशे करताय?” ती समजुतीच्या स्वरात सांगत होती,
पण तो ऐकेना,
संतापात खोलीतली खुर्ची त्याने तोडली,
घरातले धावत आले,
काय झालं त्याची काहीही चौकशी न करता तिलाच बोलू लागले,
“माझ्या लेकराला असला त्रास आजवर आम्ही कधी दिला नव्हता.. असं नाराज कधीच केलं नव्हतं त्याला”
सर्वजण तिलाच दोषी धरू लागले,
तिने आता स्वतःसाठी स्टँड घेतला,
बॅग भरली,
दोन दिवस मैत्रिणीकडे राहिली,
कारण माहेरचे चार गोष्टी सांगून पुन्हा या नरकात पाठवतील हे तिला माहीत होतं,
रीतसर तक्रार केली,
कोर्ट कचेरी सुरू झाली,
नातेवाईकांत, समजात चर्चा होऊ लागली,
“तीच नालायक दिसते, तो माणूस किती शांत आहे..”
ती जिवाच्या आकांताने सांगायची,
“तो माथेफिरू आहे, रागाच्या भरात एखाद्याचा जीवही घेऊ शकतो”
“शक्यच नाही, आम्ही आज ओळखतो का त्याला..नेहमी सर्वांना मदत करत असतो, प्रेमाने बोलतो, शांततेत राहतो”
जो तो हेच सांगायचा..
तिचं कुणीही ऐकेना,
ती अजूनच खचू लागली,
पण त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना दिसत होती,
लोकं काहीही म्हणाले तरी त्याच्यावरचे आरोप खरे होते,
लोकं त्याची बाजू घेऊन तिला शिव्या देत, त्याला कुठेतरी बोचायचं ते,
या काळात तिची किंमत त्याला समजू लागली,
ती असतांना आई आणि बहीण अगदी हातात ताट आणून देऊन दाखवायचे की त्यांना किती काळजी आहे माझी,
आता ती नाही तर साधं विचारतही नाही मला
मग ते जे होतं तो दिखावा होता का सगळा?
या काळात त्याचे वडील आजारी पडले,
त्यांच्यामागे धावताना आईचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं,
बहिणही नवऱ्याच्या एका हाकेवर सासरी पळाली,
मित्र आपापल्या संसाराला लागले,
त्याला कळून चुकलं,
कितीही जवळची लोकं असली तरी आपलं आणि हक्काचं माणूस तो गमावून बसलेला,
कोर्टाच्या तारखा सुरू होत्या,
यात एकदा त्याचा अपघात झाला,
बेडरेस्ट वर होता,
बहीण दोन दिवस आली अन निघून गेली,
आई तेवढ्यापुरतं येई अन निघून जाई,
आज त्याला समजलं,
बायको असती तर माझ्या उशाशी बसून असती,
या माणसांनी माझा संसार मोडला अन मला एकटं टाकून स्वतःच्या संसाराला लागली,
तो रडू लागला,
एके दिवशी समजलं,
तिने तक्रार मागे घेतलेली,