मराठी कथा- न्याय 1

कोर्टात ती एकटीच रडत होती,

तिच्या बाजूने म्हणायला गेलं तर अगदी मोजकीच लोकं,

आणि त्याच्यासाठी जमलेली ढीगभर मित्र,

तिने केलेले आरोप कुणाला मान्य नव्हतेच,

ती अगदी पोटतिडकीने सांगायची, पण सगळं व्यर्थ.

चार वर्षांपूर्वी लग्न झालेलं दोघांचं,

चांगल्या स्वभावाचा म्हणून सर्वत्र त्याची ओळख,

घरच्यांना वाटलं असा मुलगा शोधून सापडणार नाही,

तडकाफडकी लग्न लावून दिलं,

तिलाही अनुभव आला, तो चांगला होता,

काळजी घ्यायचा, प्रेम करायचा..

आता शेवटपर्यंत सुखाचा संसार होणार हे स्पष्ट दिसत होतं,

जसजसा सहवास वाढत गेला तसतसा एकमेकांचा स्वभाव कळू लागलेला,

छोट्यामोठ्या कुरबुरी सुरू होऊ लागल्या,

तिला तो प्रत्येक गोष्टीत टोकू लागला,

त्याच्या आई आणि बहिणीला सोबत घेऊन तिच्याविरुद्ध बोलू लागला,

सगळं कुटुंब एकीकडे आणि ती एकीकडे, अशी ती एकटी पडत गेली,

तिला कळेना,

सर्वजण चांगलं म्हणतात तो माणूस हाच का?

ती तशी अबोल,

फारश्या कुणाच्या संपर्कात नसायची,

तिचं कुटुंब आणि ती,

तेवढंच फक्त तिचं विश्व,

तिच्याबद्दल कुणी तिसऱ्या व्यक्तीला मत विचारलं तर त्यालाही सांगता येणार नाही इतकं तिचं तटस्थ वागणं,

मोजकीच माणसं होती तिची,

त्यातही आता नवरा असा वागू लागला, तिच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ लागलेला,

घरात तिला बायको म्हणून काही स्थानच नव्हतं,

मशीनसारखं कामं करायची, आणि त्यातही शंभर टोमणे ऐकायचे,

आई वडील म्हणायचे ऐकून घेत जा, उलट बोलू नकोस,


387 thoughts on “मराठी कथा- न्याय 1”

Leave a Comment