मराठी उखाणे – Marathi Ukhane – सर्वांचे मन जिंकून घेतील असे उखाणे

उखाणे घेणं म्हणजे एक गमतीचा भाग असला तरी त्यातून काहीतरी चांगला अर्थ निघेल याचे वधू वराने भान ठेवावे. लग्नकार्य म्हणजे आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा, यानंतर एक जबाबदारीचे आयुष्य जगावे लागते. त्यावेळी आपला अल्लडपणा बाजूला ठेऊन समाज, नातेवाईक यांचा आदर करण्याकडे महत्व दिले गेले पाहिजे. उखाणा घेताना कुणाचीही चेष्टा होणार नाही, कुणाचेही मन दुखावले जाणार नाही, कुणाच्याही व्यंगावर बोट ठेवले जाणार नाही याचे वधू वराने भान ठेवायला हवे.

मित्रमंडळीत विनोदी उखाणे घेत असलात तरी त्यात कुणाचा अपमान होणार नाही आणि विनोद सात्विक असतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. वधूने उखाणा घेताना आपली नवीन घरासाठी असलेली ओढ, सासरच्या मंडळींबाबत आदर आणि कर्तव्याची जाणीव याला अनुसरून उखाणा घ्यावा. वराने आपल्या बायकोला आपल्या घरात समान आदर आणि प्रेम मिळेल, त्याच्या आयुष्यात महत्वाचे स्थान मिळेल असे उखाणे घ्यावेत. उखाण्यांनी क्षणिक मनोरंजन होत असले तरी त्यातून वधू वराची मानसिकता आणि नवीन संसाराकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो.
उखाणे म्हणजे लग्न समारंभातील एक महत्वाचा भाग. महत्वाच्या कार्यक्रमात वधू वराला उखाणा घ्यावा लागतो, सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी उखाणा घेण्यासाठी आग्रह करत असतात. उखाणा म्हणजे दोन ओळींची यमक वाक्य, ज्याला नाव घेणे असेही म्हणतात. “नाव घ्या” असं म्हणत स्टेजवर, गृहप्रवेशाच्या वेळी, सत्यनारायणाच्या वेळी वधू वराला म्हटले जाते. या आग्रहाचा मान ठेऊन वधू वराने उखाणे तयार ठेवायला हवेत.

Marathi ukhane for female- वधूसाठी मराठी उखाणे- सोपे उखाणे.

खालील उखाण्यात आपले आई वडील, सासू सासरे, कुलदैवत आणि वाडवडील यांचे स्मरण आहे, हे उखाणे ऐकून वधू नक्कीच सर्वांची मनं जिंकून घेईन.

स्मरण करतो वाडवडील अन कुलदेवतेचे
***च्या साथीने स्वप्न बघू सुखी संसाराचे

***रावांच्या गळ्यात घातली माळ
जोडून ठेवू अशीच कुटुंबाची नाळ

नात्यांच्या या बंधनात, ***रावांची अनमोल साथ
देवाच्या साक्षीने करू संसार, करू प्रत्येक संकटावर मात

लग्न म्हणजे नाही केवळ तू अन मी
इथे सुरवात कित्येक नात्यांची अन सोयऱ्यांची
आई वडिलांचा आशीर्वाद अन पाहुण्यांच्या सदिच्छा
वचन देते ***रावांना, बांधून ठेवेन दोर प्रत्येक नात्याची

पार्वती माता करते शंकरासाठी नवस
वाट बघतेय माझी, **रावांच्या अंगणातील तुळस

संसारात असावे प्रेम, कुटुंबाबद्दल स्नेह, नको ते स्थान स्वार्थाला..
***रावांचे नाव घेते, आम्ही दोघे जोडले गेलो, अनेक माणसे जोडायला

पाऊस येऊन मिळतो धरणीला
अनेक जीवन फुलवायला
***रावांचे नाव घेते
आले मी सासर सजवायला..

संसार म्हणजे चटके हाताला, नाही खेळ भातुकलीचा
***रावांचे नाव घेते, आदर्श ठेवतो सासू सासऱ्यांचा

तुमचे सुंदर कुटुंब, आता माझेही झाले हक्काने
***रावांच्या साथीने, सर्वांना जिंकून घेईन प्रेमाने

नकोत मजला हिरे मोती
नको सोन्याचा गाव
**रावांच्या जोडीने करेन मेहनत
राखू कटुंबाचे नाव

संसार म्हणजे चटके हाताला, नाही खेळ भातुकलीचा
***रावांचे नाव घेते, आदर्श ठेवतो सासू सासऱ्यांचा

तुमचे सुंदर कुटुंब, आता माझेही झाले हक्काने
***रावांच्या साथीने, सर्वांना जिंकून घेईन प्रेमाने

मराठी उखाणे मुलांसाठी- marathi ukhane for male

गणेशाची मूर्ती, त्यावर जास्वंदीचा हार
***च्या जोडीने, करेन सुखाचा संसार

आयुष्य एक संघर्ष, त्यात आव्हानं किती
****आहे जोडीला, आता कशाची भीती

गृहप्रवेशाच्या वेळी घ्यायचा उखाणा- Gruh pravesh ukhana

विष्णूला शोभे लक्ष्मी
अन पार्वतीला महेश
कुलदेवतेचे नाव घेऊन
आनंदाने करते गृहप्रवेश

सासऱ्यांचे छत्र
सासूबाईंसारखी माय
गृहप्रवेश करून ठेवते
सासूबाईंच्या पावलावर पाय

कुटुंबाचे केले नंदनवन
सासूबाईंची कृपा न्यारी
गृहप्रवेश करून सांगते
आता ही जबाबदारी माझी

भावासारखा दीर
बहिणीसमान नणंद
***रावांचे नाव घेते
करेन घराचे नंदनवन

विनोदी उखाणे – Comedy Ukhane

किती किती शिकायचंय बाई पण
आहे मी ट्रॅडिशनल आणि मॉडर्न,
चला आता कामाला लागा सासुबाई,
तुम्ही माझ्या बॉस आणि मी तुमची इंटर्न…

मराठीत म्हणतात दहा, हिंदीत म्हणतात दस
ज्याने उखाणा घ्यायला लावला त्याची चुकेल बस

मोठ्याला म्हणतात गुरू
लहानाला म्हणतात लघु
***रावांच्या एका मित्राला आहेत दहा बायका
तो यातला कोण सांगा बघू?


याव्यतिरिक्त तुम्हाला काही विशेष उखाणे हवे असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा, तासाभरात तुम्हाला नवीन उखाणा लिहून रिप्लाय देऊ.

Leave a Comment