हॉस्पिटलमध्ये सर्वजण तयारीत बसलेले,
आत्ता येईल, तेव्हा येईल म्हणत सगळेजण वाट बघत होते,
पण सेलिब्रिटी लोकं ती,
वेळेवर कसली येतात,
राहुल कुमारने दिलेल्या वेळेच्या तब्बल पाच तास उशीर केला,
कित्येकांनी तो केव्हाही येऊ शकतो म्हणून जेवण टाळलं,
पण पेशंटकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली,
अखेर तो आला,त्याच्याच तोऱ्यात,
आजूबाजूला गर्दी बघून त्याने तोंड वाकडं केलं,
लोकं त्याला हाक देत होती, आनंदाने उसळ्या मारत होती,
पण तो साधं वरही बघत नव्हता,
ती आणि तिचे वडील एका कोपऱ्यात उभे राहून त्याच्याकडे बघत होते,
ती त्याचे फोटो काढत होती,
वडील मुलीचा आनंद टिपत होते,
तो आत गेला, देणगीचे सोपस्कार पार पाडले आणि लागलीच निघाला,
तो निघाला तसं वडील मुलीचा हात धरून त्याच्या मागोमाग गेले,
त्यांनी कसलाही विचार न करता त्याला हाक दिली,
“सर, माझ्या मुलीसोबत एक सेल्फी घ्या ना..”
त्याने वळूनही पाहिलं नाही,
वडील मुलीला घेऊन समोर गेले आणि पुन्हा त्याला विनंती करू लागले,
तिला हे आवडलं नाही, पण वडिलांना माहीत होतं की हा सेल्फी मिळाला की माझी मुलगी किती खुश होईल ते,
राहुल कुमारच्या मस्तकात आग गेली, तो चिडला,
त्याने वडिलांना असा काही धक्का दिला की वडील बाजूला जाऊन पडले, जवळच एक अणकुचीदार वस्तू होती, त्यांच्या पायाला जखम झाली..
त्याने वळूनही पाहिले नाही आणि तो निघून गेला,
हॉस्पिटल स्टाफला हे अजिबात आवडलं नाही,
त्यांनी वडिलांना उचलले, त्यांच्या पायाला मलमपट्टी केली,
जवळपास महिनाभर ती जखम त्यांना त्रास देत होती,
चालता येत नव्हतं,
आपल्या डोळ्यासंमोर वडिलांचा असा अपमान तिने पाहिलेला,
कितीही झालं तरी आपले वडील आहेत ते,
असेल हा मोठा सुपरस्टार, पण म्हणून माझ्या वडिलांना अशी वागणूक देणार?
तो एक क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता,
प्रत्येक क्षणी तिच्या मनात संताप उफाळून येत होता,
एकवेळ स्वतःचा अपमान माणूस सहन करेल, पण आपले प्रेरणास्थान असलेल्या, आपला आधारस्तंभ असलेल्या बापाची अशी अवहेलना ती कदापि पचवू शकणार नव्हती,
तिने मनाशी ठरवलं,
याला धडा शिकवायचा,
मित्र मैत्रिणींची मदत घेतली,
एक जण म्हणाला त्याचा व्हिडीओ व्हायरल करू,
पण ती घटना घडल्याचं फुटेज कुठेच मिळालं नाही,
तिने पोलिसात रीतसर तक्रार केली,
*****
1 thought on “मरणयातना-2”