मरणयातना-1

“शीला येतेस ना? राहुल कुमार येईलच आत्ता थोड्यावेळात”

वडील आपल्या मुलीला फोन करून सांगत होते,

“बाबा लगेच येते..”

राहुल कुमार, एक मोठा नट,

देशात त्याची प्रचंड लोकप्रियता,

त्याची एक झलक बघण्यासाठी लोकं लाईन लावत,

आज तो एका हॉस्पिटलला भेट देऊन त्यांना देणगी देणार होता,

देणगी कसली, टॅक्स वाचवण्यासाठी काहीतरी उद्योग,

त्याच हॉस्पिटलमध्ये तिचे वडील कर्मचारी होते,

तो येणार म्हणून हॉस्पिटलमध्ये मोठी व्यवस्था लावण्यात आलेली,

बाहेरच्या लोकांना आत यायची परवानगी नव्हती,

पण वडिलांनी आपल्या मुलीला येऊ देण्याची व्यवस्था करून ठेवली,

जुने कर्मचारी म्हणून हॉस्पिटल स्टाफने सुद्धा तिला येण्याची परवानगी दिली,

सर्वजण तिला ओळखत होते, कायम येणं जाणं असायचं तिचं,

त्यात तिचा गोड स्वभाव,

सर्वांची आवडती होती ती,

तिला नाही कोण म्हणणार?

आणि राहुल कुमार म्हणजे तिचा आवडता नट,

त्याचा एकही चित्रपट तिने सोडला नव्हता,

आज तो प्रत्यक्ष दिसणार म्हणून ती सैरभैर झालेली..

****

Leave a Comment