हळूहळू संगीता तिथे रुळू लागली,
आई सुट्टीच्या दिवशी तिला फोन करून चौकशी करायची,
“आई अगं रंगकाम काढलंय.. बरीच वर्षे झालेली रंग देऊन त्यामुळे आता नव्याने रंग देऊन घेतोय”
“मग तुझ्या खोलीला कोणता रंग संगीतलास?”
“ते माझ्या सासूबाई ठरवतील, मला विचारलं नाही त्यांनी” संगीता फक्त माहिती देत होती, तिच्यात तक्रारीचा सूर नव्हता..
आईला काहीसं रुतलं, पण काही बोलली नाही.
पुढच्या खेपेस आईने फोन केला,
“संगीता तुला इकडे असताना एक पितळी खलबत्ता आवडलेला बघ, बाजारात पाहिला मी तसाच, तुझ्यासाठी घेऊयात का?”
“थांब आई, मी सासूबाईंना आधी विचारते..त्यांना आवडत असेल तर सांगते तुला”
आईला पुन्हा वाईट वाटलं, स्वतःच्या आवडीच्या वस्तूही हिने घेऊ नये? संगीताला ते लक्षात आलं आणि ती म्हणाली,
“अगं आई माझ्या खोलीत मी स्वतःच्या आवडीच्या वस्तू घेतल्या आहेत, सासूबाईनी सांगितलं की तुला पटेल तशी तुझी खोली सजव म्हणून”
“मग रंगकाम करताना का विचारलं नाही?”
“आई मी नवीन आहे घरात, थोडा वेळ दे मला”
इथे मुलगी आईला समजावत होती, फार कमी वेळा हे दृश्य बघायला मिळतं..
एकदा संगीताचे आई वडील तिला भेटायला तिच्या घरी गेले, घरातील मंडळींनी मोठ्या अदबीने त्यांचं स्वागत केलं. त्यांचा 2 दिवस तिथेच मुक्काम होता.
संगीता सासूबाईंना विचारू लागली,
****