बागेतली गोष्ट-1

“संगीता…ए संगीता.. कुठे गेली गडे ही पोरगी..”

आई आपल्या 10 वर्षाच्या मुलीला शोधत होती, खिडकीतून डोकावून पाहिलं तर तिचा आणि आजीचा घरासमोरच्या बागेत काहीतरी संवाद सुरू होता.

तेवढ्यात मागून संगीताचे बाबा आले आणि तेही पाहू लागले.

“घरातल्या मोठ्यांच्या सहवासात मुलांवर संस्कार होतात, आपण नशीबवान आहोत..”

आई हसली आणि तिनेही मान डोलावली.

बरीच वर्षे उलटली, संगीता मोठी झाली.

तिच्या लग्नाचा विषय सुरू होता. संगीता तशी शिकलेली, शाळेत नोकरीला. पण लग्नाच्या बाबतीत समाज अजूनही पुढारलेला नव्हता.

एक स्थळ आलं आणि सर्वांना पसंत पडलं. आई वडिलांना थोडी काळजी होती, एकत्र कुटुंब, घरात 10-12 माणसं, आपली पोर कसा तग धरणार?

पण बाकी सर्व चांगलं होतं,

आणि विशेष म्हणजे सांगीताला पाहताक्षणी तो मुलगा पसंत पडला त्यामुळे नकाराचं काही कारणच नव्हतं..
***

Leave a Comment