फोटो-1

“अगं ऐकलं का, आज माझे काही मित्र येणारेत घरी नाश्त्याला..”

“बरं काय बनवू मी? अरे बापरे, मी तर डोक्याला मेहेंदी लावून बसलीये.. पटकन अंघोळ करून घेते..आणि त्यांना यायला वेळ आहे ना अजून? मी ही अशी गाऊन मधेच…मला असं पाहिलं तर तुलाच लाज वाटेल, म्हणशील ही आमची कामवाली बाई..”

“गप गं… तू अगदी अशीच समोर आलीस ना तरी मला काही वाटणार नाही…मला नाही वाटत लाज. तुझ्या अवतारावरून ते तुझ्याबद्दल मत बनवत असतील तर ती त्यांची चूक…मी तर बाबा माझ्या बायकोच्या गुणांवर प्रेम करतो”

ती हसायला लागते,

“आला मोठा गुणग्राहक…”

काहीही म्हणा, पण तिचा नवरा खरंच अगदी निरागस आणि सुस्वभावी होता..मनात एवढीशी कटुता नव्हती,

म्हणूनच तर घरात माणसांची सतत रेलचेल चाले..

तिने छानपैकी तयारी केली, घर आवरलं, चविष्ट नाष्टा बनवला,

मित्र येताच त्यांचे हसून स्वागत केले आणि पाहुणचार केला,

मित्रांनी नाश्त्याचं कौतुक करत हसतमुखाने निरोप घेतला..

ही दोघे खुश झाली, या जोडप्याला माणसं जोडायला आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायला फार आवडायचं,

म्हणूनच खूप समाधानी आयुष्य जगत होते दोघे..

” फार दमली असशील तू..आता आराम कर, मी जरा बँकेत जाऊन आलो..काम आहे..”

“बरं..”

तो बँकेत निघून गेला आणि ही बेडवर पडल्या पडल्या मोबाईल चाळू लागली,

स्क्रोल करता करता तिला तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीचा फोटो दिसला, आणि तिला धक्काच बसला..

*****

2 thoughts on “फोटो-1”

  1. I loved you even more than you’ll say here. The picture is nice and your writing is stylish, but you read it quickly. I think you should give it another chance soon. I’ll likely do that again and again if you keep this walk safe.

    Reply
  2. It was great seeing how much work you put into it. The picture is nice, and your writing style is stylish, but you seem to be worrying that you should be presenting the next article. I’ll almost certainly be back to read more of your work if you take care of this hike.

    Reply

Leave a Comment