पाहुण्यांची चौकशी, त्यांचा चहा नाष्टा,
याउलट योगेशची बायको जुजबी बोलून आपल्या कामासाठी निघून जाई,
नुकतीच ती एका ठिकाणी कामाला लागली होती, त्यामुळे घरात तिचं लक्ष कमीच असायचं,
गणेशची बायको नकळत तिच्याशी स्पर्धा करे,
योगेशच्या बायकोला जास्त काही करू न देण्यात तिला आनंद वाटे, कारण यातून दोन गोष्टी साध्य होत,
एक तर तिचा घरात वावर जास्त असल्याने सगळे तिलाच विचारत आणि दुसरीकडे योगेशच्या बायकोलाही तिच्यामुळे काम पुरत नसे आणि तिला आरामात कामावर जाता येई..त्यामुळे ती आपल्या जाऊवर खुश होती,
लग्नसमारंभ, घरातील कार्यक्रम या निमित्ताने सर्व मंडळी एकत्र येत तेव्हा गणेशच्या बायकोचीच चर्चा होत असे,
तिने घराला किती छान सांभाळलं, सर्वांशी किती छान राहते वगैरे,
याउलट योगेशच्या बायकोबद्दल लोकांची उलटसुलट मतं बनू लागली,
“योगेशची बायको काही कामाची नाही, कुठे दिसतही नाही, समोर आली तर बोलत पण नाही”
गणेशच्या बायकोला युद्ध जिंकल्याचा भास होई, यासाठीच तर खटाटोप केलेला तिने,
गणेश सुदधा आपल्या बायकोवर खुश होता,
तिकडे योगेशच्या बायकोला दुसऱ्या शहरात एका चांगल्या कामाची ऑफर आली, दोघेही तिकडे शिफ्ट झाले,
बायको साठी स्वतःची नोकरी सोडणारा म्हणून त्यालाही बरेच बोल लागले, पण त्याने विचार केला नाही..
वर्ष सरली,
गणेशची बायको आता थकली होती,
सर्वांचं करून करून तिचा जीव अगदी मेटाकुटीला येई,
सर्वांनी तिला गृहीत धरलंच होतं,
तिकडे योगेशच्या बायकोने अल्पावधीतच कंपनीत नाव कमावलंहोतं, मध्यंतरी तिचा पेपरमध्ये फोटोही आलेला..
बऱ्याच वर्षानंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचं एक लग्न होतं, तेव्हा सर्वजण एकत्र आलेले..