फळ-1

गणेश आणि योगेश,

दोन्ही जुळे भाऊ,

दोघांची लग्न एकाच मांडवात,

म्हणायला जुळे भाऊ, पण विचार दोन टोकाचे,

गणेशला हवी होती घरकाम करणारी बायको,

आणि योगेशला हवी होती आधुनिक जगात वावरणारी मुलगी,

दोघांनाही त्यांच्या मनाप्रमाणे बायका मिळाल्या,

आणि थाटामाटात लग्न झालं,

गणेशने पहिल्या दिवशीच आपल्या बायकोला सांगितलं,

तुला घराण्यात नाव कमवावं लागेल, सर्वांची मनं जिंकावी लागतील,

तिनेही होकारार्थी मान डोलावली,

याउलट योगेश आपल्या बायकोला सांगत असायचा, की स्वतःची ओळख बनव, काहीतरी करून दाखव..

सर्वजण घरात आनंदाने रहात होते,

सासूबाईंना आपल्या दोन्ही सुनांवर अभिमान होता,

सासरे आपल्या भरल्या गोकुळाकडे समाधानाने बघत होते,

हळूहळू दिवस सरत गेले,

नातेवाईक घरी येत, सुनांना बघून जात..

गणेशची बायको पूर्णवेळ आदरातिथ्य करण्यात घालवे,


Leave a Comment