फळ-अंतिम

गणेशची बायको मोठया खुशीत होती,

दरवेळी अश्या समारंभात तिचं कौतुक होई, गणेशची बायको किती चांगली म्हणून सर्वजण तिला चांगलं म्हणत,

यावेळीही ती याच समजुतीत गेली,

गेल्यावर सर्वजण भेटले,

खूप वर्षांनी सगळे नातेवाईक एकत्र आले होते,
गणेश ची बायको सर्वांना भेटली,

पण नातेवाईक पण कौतुक करून करून किती करणार, या ना त्या कारणाने घरी जाणं होई तेव्हा ती दिसायचीच,

थोड्या वेळाने योगेश आणि त्याची बायको तिथे आले,

ते येताच सर्वांच्या नजरा त्यांचावर खिळल्या,

नवीन शहरात राहून तिथलं राहणीमान, पोशाख त्यांनी बऱ्यापैकी सुधरवला होता, त्यांच्याकडे सर्वजण बघतच राहिले,

जे नातेवाईक योगेशच्या बायकोबद्दल उलटसुलट बोलायचे तेच आता त्यांच्याजवळ धावत गेले,

“तुझा फोटो पहिला बरं का आम्ही पेपरमध्ये, खूप छान प्रगती केलीस हो..!”

“आम्हाला तर सारखी आठवण यायची..मी माझ्या सुयशला पण सांगतो की बघ, काकूसारखं पेपरमध्ये नाव आलं पाहिजे”

“ताई तू इन्स्टाग्रामवर ते फोटो टाकलेले तो कुठला देश गं? फार सुंदर आलेत गं फोटो”

पूर्ण समारंभ होईपर्यंत सर्वजण त्या दोघांच्या अवतीभवतीच होते,

गणेश आणि त्याच्या बायकोचा चेहरा एकदम पडला,इतकी वर्षे लोकांची मनं जिंकायची म्हणून वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवल्या, पण शेवटी नाव मात्र योगेश अन त्याच्या बायकोचंच,

इकडे योगेशच्या बायकोला एकजण तिच्या क्षेत्रातील करियर बद्दल विचारत होतं, योगेशची बायको सांगत होती आणि सांगता सांगता तिला ठसका लागला,

आजूबाजूचे नातेवाईक म्हणू लागले,
“पाणी आना पाणी आना..”

तिथेच उभ्या असलेल्या गणेशच्या बायकोला सर्वांनी ऑर्डर दिली.. “जा पटकन एक ग्लास पाणी घेऊन ये”

गणेशच्या बायकोने पाणी तर आणून दिले पण त्या क्षणी डोळ्यापुढे सरसर भूतकाळ उभा राहिला..

सर्वांची मन जिंकावी, आपलं नाव निघावं म्हणून तिने स्वतःचं सगळं बाजूला ठेवलेलं..आपल्या जावेपेक्षा आपण मोठं असावं या अट्टहासापायी सगळा खटाटोप केलेला..

याउलट योगेशच्या बायकोने याकडे लक्ष दिलं नाही,

सगळा वेळ स्वतःची प्रगती करण्यात घालवला.

पण आज झालं काय?

या गोष्टीचे तात्पर्य:

दुसऱ्याचं मन जरूर जिंकावं पण त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावू नये,

कितीही केलं तरी जो कर्तृत्ववान बनतो त्याचीच समाज पूजा करतो,

लोक आज एकाला उचलून धरतात तर उद्या दुसऱ्याला, लोकांच्या good books मध्ये राहण्याला आयुष्य वाया घालवू नये.

Leave a Comment