प्रक्रिया-1

“तू अशी अचानक त्याला नाही का म्हणतेय लग्नाला? खूप प्रेम होतं ना तुमचं एकमेकांवर?”

“होतं काय? अजूनही आहे..”

“मग कुठे घोडं अडलं?”

“आजवर मला फक्त तो माहीत होता, पण त्याच्या घरच्यांनबद्दल समजलं आणि..”

“आणि काय?”

“आता मनात चलबिचल होतेय..”

“असं झालंय तरी काय?”

“बरं.. तुला स्पष्टच सांगते. त्याचं आणि माझं प्रेम आहे हे खरंय, पण मला फक्त त्याच्यासोबत नाही राहायचं..त्याच्या घरच्यांसोबत मला राहावं लागेल..”

“मग तुला एकटा मुलगा हवाय की काय?”

“तसं नाही गं, सासू सासरे नकोत अश्या संस्कारांची मी नाहीये..पण, त्याच्या घरची एकंदरीत परिस्थिती मला हळूहळू समजू लागली.. त्याचे आई वडील, फारसे शिकलेले नाहीत. त्याची बहीण एक गृहिणी, त्यामुळे शिक्षणाचं आणि नोकरीचं महत्व त्यांना असेल असं मला वाटत नाही..माझी विचारसरणी आधुनिक आहे, उद्या त्याच्या घरच्यांशी जुळवून घ्यायला मला कठीण जाईल आणि आमच्या नात्यात वितुष्ट निर्माण होईल..”

“तुला खरंच असं वाटतंय?”

“हो, खूप प्रॅक्टिकली विचार करतेय मी..”

“मग आता? त्याला नाही म्हणणार आहेस का?”

निःशब्द…

“मी तुला एक सांगेन फक्त, जर प्रेम घट्ट असेल तर बाकीच्या गोष्टींवर मात करता येते. प्रॅक्टिकली विचार करत असशील तर तुला तुझ्या मनासारखं घर मिळेल, पण आपल्या प्रेमाला आपण तिलांजली दिली हे ओझं आयुष्यभर मनात ठेवून जगशील..”
****

भाग 3

Leave a Comment